कणकवलीकोकणमहाराष्ट्र

देवगड,वैभववाडी रुग्णालयात अधीक्षक आणि तज्ज्ञ डॉक्टरांची पदे तातडीने भरणार

*🟥,देवगड,वैभववाडी रुग्णालयात अधीक्षक आणि तज्ज्ञ डॉक्टरांची पदे तातडीने भरणार*

*🟥आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आमदार नितेश राणे यांना आश्वासन*

*🟥कणकवली मतदार संघाच्या आरोग्य सेवेचा नागपूर विधान भवनात आरोग्य मंत्र्यांनी घेतला आढावा*

*🟥आरोग्य सेक्रेटरी,कमिशनर, डायरेक्टर यांच्या बैठकीत दिल्या दर्जेदार रुग्णसेवेच्या सूचना*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴 कणकवली, दि.१३*
कणकवली उपजिल्हा रुग्णालय आणि देवगड व वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात अधीक्षक आणि तज्ज्ञ डॉक्टरांची पदे लवकरच भरली जातील. मेडिकल ऑफिसर तांत्रिक आणि अ तांत्रिक कर्मचारी महिना – दीड महिन्यात नियुक्त केले जातील. काही डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची नव्याने भरती केली जाईल.तर काही पदे बदली प्रक्रियेतून भरली जातील. कणकवली विधानसभा मतदारसंघात आरोग्याच्या संदर्भात कोणत्याच तक्रारी येणार नाहीत अशा पद्धतीची सेवा आपण देऊ असे आश्वासन राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत आमदार नितेश राणे यांना दिले. कणकवली मतदार संघातील कणकवली ,देवगड, वैभववाडी या तिन्ही तालुक्यातील आरोग्यसेवा दर्जेदार करण्यासाठी आणि रिक्त पदे भरण्या संदर्भात भाजप आमदार नितेश राणे यांच्या आग्रहास्तव नागपूर विधान भवनात बैठक झाली. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ.म्हैसकर, कमिशनर डॉ. धीरज कुमार, डायरेक्टर डॉ.कंदेवाड, डेप्युटी डायरेक्ट डॉ.दिलीप माने,सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील व या विषयाशी संबंधित इतर अधिकारी उपस्थित होते. कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे अधीक्षक आणि तज्ञ डॉक्टर यांच्या नियुक्ती तातडीने केल्या जातील, त्याचप्रमाणे देवगड ग्रामीण रुग्णालयात सुद्धा रिक्त असलेली पदे भरली जातील. वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाची ही सर्व पदे भरली जातील त्यातील काही पदेही या महिन्यातच पूर्ण केली जातील तर काही बदल्या प्रक्रियेतून येत्या दोन महिन्यात रिक्त जागी नवीन अधिकारी आणि डॉक्टर नियुक्त केले जातील. डॉक्टर नसल्यामुळे आरोग्य सेवेचा जो खोळंबा होत आहे तो होणार नाही आणि चांगली सेवा प्रत्येक रुग्णाला मिळेल असा अशा पद्धतीची व्यवस्था या प्रत्येक रुग्णालयात करून देण्याचे विश्वास आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आमदार नितेश राणे यांना या बैठकीत दिले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!