खलाशाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तांडेलाचा मृत्यू
*🟥खलाशाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तांडेलाचा मृत्यू*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 देवगड, दि.१३:* देवगड बंदरामध्ये ‘मुक्ताई’ बोटीवरील खलाशी संशयित अनंत तुकाराम तांबे याने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी असलेल्या बोटीवरील तांडेल रणजीत बबन डोर्लेकर (४५) याचा गोवा-बांबोळी येथे उपचारादरम्यान सोमवारी रात्री मृत्यू झाला. या घटनेत जखमी असलेला अन्य एक खलाशी शशिकांत तुकाराम पत्याने व संशयित आरोपी अनंत तांबे याच्या प्रकृतीत सुधारणा आहे. देवगड बंदरामध्ये सोमवारी पहाटे ४.३० वा. सुमारास श्रीमती प्रज्ञा पेडणेकर यांच्या मालकीच्या ‘मुक्ताई’ या बोटीवरील खलाशी अनंत तांबे याने अचानकपणे सहकारी खलाशांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. बोटीचा तांडेल रणजीत डोर्लेकर हा त्याला समजावण्यासाठी जात असतानाच त्याने बोटीवर असलेला बर्फ फोडायच्या लोखंडी भाल्याने अचानक हल्ला करीत डोर्लेकर यांच्या डोक्यावर जोरदार आघात केला. डोर्लेकर यांना वाचविण्यासाठी दुसरा खलाशी शशिकांत पत्याने हे पुढे सरसावले असता त्यांच्यावरही संशयित तांबे याने हल्ला केला होता. यात पत्याने यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर संशयित तांबे याने राजेश आंबेरकर या खलाशाला मारहाण करून त्यांना दुखापत केली होती. संशयित तांबे गोळा करून ते बोटीवरील जाळ्यांवर टाकले. त्यावर बोटीवरील कॅनातील डिझेल ओतून बोटीला पेटवून दिले होते. बोटीवर आगीचे लोळ दिसल्याने नजीकच्या बोटीवरील खलाशांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझविली व बोटीवरील संशयित तांबे याला सुरक्षित किनारी आणून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, रणजीत डोर्लेकर यांच्या डोक्यावर लोखंडी भाल्यामुळे मेंदूला गंभीर इजा झाल्याने त्यांना गोवा- बांबुळी येथे अधिक उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथे उपचार सुरू असतानाच सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
