🟥 कांदा निर्यातबंदीवरून विरोधकांची राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴नागपूर, दि-१२:- केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्याने कांद्याचे भाव गडगडले आहेत. राज्य सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधक आक्रमक झाले असून, विरोधकांनी कांद्यांची माळ आणि टोपलीत कांदा घेऊन नागपूर विधानभवन परिसरात मोर्चा काढला.यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी कांद्यावरील निर्यातबंदी हटवली पाहिजे, कांद्याला भाव मिळाला पाहिजे. यासाठीविरोधकांनी या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने सोमवारी विधानभवन परिसरात आंदोलन केले.या मागणीसाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर कांदयांच्या माळा हातात घेऊन महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
कांद्याला 4 हजार 500 रुपये इतका भाव असताना कांदा बंदी निर्यात केल्यावर तासाभरातच तो घसरून 1200 रुपये इतका झाला. निर्यातबंदी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.कांदा निर्यात बंदी ही केंद्राच्या मोदी सरकारने केली त्याला राज्य सरकारने विरोध केला पाहिजे होता, मात्र ते मुंग गिळून गप्प बसले अशा शब्दात सत्ताधाऱ्यांवर दानवे यांनी निशाणा साधला.एकप्रकारे कांदा निर्यात बंदी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर केंद्र सरकारने आघात व अन्याय केला आहे. महाविकास आघाडी या शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही दानवे यांनी शेतकऱ्यांना दिली.
कांदा निर्यातबंदी बाबत सरकारला सभागृह व सभागृहाबाहेर सलो की पळो करून सोडणार असा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

