वैश्य समाज युवक संघटना, चिपळूण च्या अध्यक्षपदी रोहन चौधरी व उपाध्यक्ष पदी सागर गांधी..
▪️संघटनेला नवसंजीवनी देण्याहेतूने संस्थापक अध्यक्षांची सर्वानुमते पुन्हा एकदा बिनविरोध अध्यक्षपदी निवड..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.१६: येथे दिनांक १४ डिसेंबर २०२० रोजी वैश्य समाज युवक संघटना, चिपळूण च्या वैश्य भवन, राधाताई लाड सभागृह येथे झालेल्या सभेमध्ये विद्यमान कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत संघटनेला एक नवसंजीवनी देण्याहेतूने पुन्हा एकदा उभारी घ्यायला हवी या विचारधारेतून आत्ताची गरज ओळखून संस्थापक अध्यक्ष म्हणून आपली कारकिर्द जबाबदारीने व यशस्वीरित्या पार पाडणारे युवा उद्योजक श्री. रोहन चौधरी यांची पुन्हा एकदा सर्वानुमते *वैश्य समाज युवक संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
सोबतच उपाध्यक्ष पदी प्रसिद्ध इंटेरियर डिझाईनर श्री. सागर गांधी, सेक्रेटरी पदी इलेक्ट्रिक मटेरियल डिलर श्री. अंकुश गांधी आणि खजिनदार पदी नामांकित कॅटेरिंग व्यावसायिक श्री. कल्पेश कापडी यांची निवड करण्यात आली.
आजच्या झालेल्या निवडीमुळे सर्व युवकांमधून एक नवचैतन्य व समाधान व्यक्त करण्यात आले.
लवकरच पुन्हा एकदा नव्या जोशाने वैश्य समाज युवक संघटना आपल्या समाजसेवेच्या लोकोपयोगी उपक्रमांना सुरुवात करेल अशी हमी नूतन अध्यक्ष श्री. रोहन चौधरी व इतर पदाधिकारी यांनी दिली.
सर्व नूतन पदाधिकारी यांचे उपस्थितांनी अभिनंदन करुन पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व संघटनेच्या समाजोपयोगी सर्व उपक्रमांमध्ये सोबत असू अशी ग्वाही दिली. सदरील सभेला सल्लागार श्री. देवेंद्र रेडीज, श्री. नितीन देवळेकर, सदस्य श्री. सुयोग चौधरी, श्री. ओंकार रेडीज, श्री. प्रथमेश कापडी, श्री. श्रीनाथ खेडेकर, श्री. विपुल गांधी, श्री. कपिल म्हापूस्कर व इतर उपस्थित होते.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

