कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

रेशनकार्ड वर वितरित होणाऱ्या तांदळा संदर्भात मनसेची तहसील कार्यालयात पुरवठा विभागाला धडक

 🟥 45 प्रोटीन युक्त तांदूळ असल्यास तशी पुरवठा विभागाकडून प्रत्येक गावात जनजागृती करा ; आशिष सुभेदार

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : नाना धोंड

🎴सावंतवाडी, दि-०७:- आज सावंतवाडी तालुक्यातील गावात रेशन दुकानात मोफत व अल्प दरात धान्य पुरवठा केला जातो. या धान्यात जे तांदूळ वितरित केले जातात त्या तांदळात काही तांदूळ हे प्लास्टिक सदृश दिसून आले. हे तांदूळ जर हाताने दाबले असता ते फुटत नाही. दाताने चावले असता तसेच शिजवल्यानंतरही चिवट लागतात अशी तक्रार सावंतवाडी तालुक्यातील आरोस तिरोडा नाणोस शेर्ले माडखोल इन्सुलि न्हावेली आदी भागातून बऱ्याच लोकांनी मनसे कडे केली. या विषयाला अनुसरून मनसेचे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष आशिष सुभेदार, मनसेचे माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक, मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष संदेश सावंत, सुरेंद्र कोठावळे, विद्यार्थी सेना तालुका सचिव मनोज कांबळी,नंदू परब, प्रणित तळकर,दिलीप नाईक, गुरुनाथ नाईक, व इतर मनसैनिक यांनी तहसीलदार यांची भेट घेतली असता पुरवठा अधिकारी यांनी हा तांदूळ प्लास्टिकचा नसून 45 प्रोटीन युक्त तांदूळ असल्याचे सांगितले. हे तांदूळ खाण्यायोग्य असल्याचे पुरवठा अधिकारी यांनी सांगितले. पण या तांदळाच्या बाबतीत ग्रामीण भागात लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून हे तांदूळ जर खाण्यायोग्य आहेत तर तहसील कार्यालयामार्फत याची जनजागृती होणे आवश्यक आहे. तसेच सदर तांदळाचे नमुने तपासणीसाठी मनसे मार्फत प्रयोगशाळेत पाठवण्यात येतील तसेच तहसील कार्यालयामार्फत सुद्धा हे नमुने तपासणीसाठी पाठवण्याची ग्वाहि सावंतवाडी तहसीलदार श्री.श्रीधर पाटील यांनी दिली तर सावंतवाडीत ग्रामीण भागात संभ्रम दूर होण्यासाठी जनजागृती करा अशी मागणी उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली तशी जनजागृती करण्याची ग्वाही तहसीलदार श्री श्रीधर पाटील यांनी दिली.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

 

————————————

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!