कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 एक दिवस छोट्यांसाठीच्या कार्यक्रमाचे आमदार नितेश राणे यांनी केले उद्घाटन

🟥 एक दिवस छोट्यांसाठीच्या कार्यक्रमात मुलांची धम्माल मौज मजा

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली, दि-०३:- समीर नलावडे यांनी गेल्या ५ वर्षात आदर्शवत काम केलं आहे. कणकवली विकसित आणि अग्रेसर शहर म्हणून पाहिलं जात आहे. राजकारणात पद असेपर्यंतच लोकप्रतिनिधी लोकांची सेवा करतात. पण ते पद गेल्यानंतर मतदारांकडे दुर्लक्ष करतात. मात्र कणकवलीचे नगराध्यक्ष नसतानाही कणकवलीकरांसाठी अशा प्रकारचे उपक्रम चालू ठेवणे हे फार मोठे नेतृत्वगुण समीर नलावडे व त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आहेत, कणकवलीत सलग ४ वर्षे खाऊ गल्ली सारखे अनोखे उपक्रम मुंबईसारख्या ठिकाणी होत नाहीत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आमच्यावर केलेल्या संस्कार आणि शिकवण डोळ्यासमोर ठेवून पद असो किवा नसो.. सातत्याने लोकांची सेवा करीत राहायचे कार्य समीर नलावडे, बंडू हर्णे व त्यांच्या सहकारी करीत असल्याचे प्रतिपादन भाजपा आमदार नितेश राणे यांनी केले.

कणकवली गणपती साना येथे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने एक दिवस छोट्यांसाठी हा गेली ४ वर्ष राबवत लहान मुलांसाठी आहेत. या कार्यक्रमाचे भाजपा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. खाऊ गल्लीचा चॉकलेट च्या “खजिना” आमदार नितेश राणे यांनी चावी लावत उघडला आणि शेकडो मुले अक्षरशः या खजिन्यावर तुटून पडत लूट केली. त्यानंतर या खजिन्यातील लपवलेले चॉकलेट मध्ये असलेल्या चार चांदीच्या कॉईनच्या चिठ्ठ्यांसाठी सर्वांचीच उत्कंठा शिगेला ताणली. या चॉकलेट मध्ये चांदीच्या कॉइन साठी ज्या चिठ्ठ्या लपवण्यात आल्या होत्या. त्यानंतर यातून चार जण भाग्यवान विजेते निवडले गेले. या चारही भाग्यवान विजेत्यांना आमदार नितेश राणेंच्या हस्ते चांदीचे कॉइन देऊन गौरविण्यात आले. एक दिवस छोट्यांसाठी या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. टेंबवाडी रस्ता ते ते गणपती साण्यापर्यंत अवघा परिसर गर्दीने फुलून गेला होता. अनेक खाद्यपदार्थाचे स्टॉल, छोट्यांसाठी विविध प्रकारची खेळणी, मिकी माऊस, या सोबतच सेल्फी पॉइंट व गाण्यांचा नजराणा व अनेक विविध उपक्रमांनी एक दिवस छोट्यांसाठीचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यादगार ठरला.

या एक दिवस छोट्यांसाठी खाऊ गल्ली या कार्यक्रमात सिंधू संकल्प अकादमी प्रस्तुत रोलर्स म्युझिकचे गायक संज्योती जगदाळे, हर्षद मेस्त्री, साक्षी मांजरेकर, निवेदक संजय धुरी यांनी उत्कृष्ठ सादरीकरण केले. जादूगार प्रसाद यांचे मनोरंजनात्मक व चित्त थरारक जादूचे प्रयोग सादर करण्यात आले. लकी ड्रॉ, मुलांना कुपन व अन्य धमाकेदार कार्यक्रमांमुळे लहान मुलांमध्ये कार्यक्रमाची उत्सुकता वाढली होती.

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या माध्यमातून ठेवलेल्या छोट्यांना पन्नास रुपयांचे कुपन घेण्याकरिता रांगा लागल्या होत्या. तर नदीपात्रात करण्यात आलेल्या कारंज्याने उपस्थित त्यांचे लक्ष वेधून घेतले. सेल्फी पॉईंट मध्ये फोटो काढण्यासाठी अनेकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार नितेश राणे यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष गोटया सावंत, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक संजय कामतेकर, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप मेस्त्री, मेधा गांगण, अभिजीत मुसळे, किशोर राणे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, सोसायटी चेअरमन संदीप नलावडे, बंडू गांगण, चारुदत्त साटम, मेघा सावंत, कविता राणे, रवींद्र गायकवाड, राज नलावडे, शिशिर परुळेकर, प्रतीक्षा सावंत, सुप्रिया नलावडे, मेघा सावंत, प्रतीक्षा सावंत महेश सावंत, प्राची कर्पे, संजना सदडेकर, राजू गवाणकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लागलेल्या खाद्यपदार्थाच्या स्टॉल व खेळांच्या ठिकाणी मुलांनी तुडुंब गर्दी केली होती.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

I

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!