चिपळूण कापसाळ ग्रामस्थांनी केला वणवा मुक्तीचा निर्धार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि.१५: येथील ‘वणवा मुक्त कोकण’ने सुरु केलेल्या अभियानाला तालुक्यातील गावांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून नुकताच नजीकच्या कापसाळ गावानेही ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या जनजागृती फलक अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने वणवा मुक्त गावाचा निर्धार केला आहे. यावेळी निलेश हरिश्चंद्र कांबळी यांच्या सौजन्याने उपलब्ध झालेले जनजागृती फलक ‘वणवा मुक्त कोकण’चे अध्यक्ष श्रीराम रेडिज यांच्या हस्ते कापसाळ ग्रामपंचायतीच्या प्रशासक सायली शिंदे यांच्याकडे सपूर्द करण्यात आले. ‘वणवा मुक्त कोकण’चे सल्लागार प्रकाश (बापू) काणे यांनी यावेळी वणव्यांच्या दुष्परिणामांची माहिती दिली. ‘वणवा मुक्त कोकण’चे उपाध्यक्ष निलेश बापट यांनी ग्रामीण भागासाठी राबविली जाणाऱ्या रोजगार विषयक प्रशिक्षणांची माहिती दिली. ‘वणवा मुक्त कोकण’चे उपाध्यक्ष यांनी प्रविण कांबळी यांनी वणवा मुक्त गाव झाल्यास गावात काजू लागवड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी पुढे येतील. त्यातून रोजगार निर्मिती होईल असे सांगितले. श्रीराम रेडीज यांनी ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांबाबत मार्गदर्शन केले.
कापसाळचे पोलिस पाटील विजय साळवी, हरिश्चंद्र कांबळी, सुभाष साळवी, संजय चांदे, शैलेश कांबळी, दिलीप साळवी, भरत कांबळी, रविंद्र डिगे, संतोष महाडिक, रमण मोहिते, मोहन खेडेकर, सौ.प्रतिज्ञा कांबळी आदि यावेळी उपस्थित होते.
वणवा लागू नये याकरिता वाडीनिहाय कमिटी स्थापन करून कार्यवाही सुरु करण्याबाबत उपस्थित ग्रामस्थांनी निर्णय घेतला.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

