महाराष्ट्रराजकीय

🟥 सगळ्या जगाला माहितीय माझी जात कोणती ; व्हायरल जातीच्या दाखल्यावर स्पष्टच बोलले शरद पवार..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴बारामती, दि-१४:– जन्मानं दिलेली जात मी लपवत नाही, सगळ्या जगाला माहितीय माझी जात काय आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या खोट्या जातीच्या दाखल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.तसेच, मराठा आरक्षणाबाबत बोलताना मराठा तरुणांची भावना तीव्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असंही शरद पवार म्हणाले आहेत. आज दिवाळी पाडव्याचा गोविंदबागेतील कार्यक्रम आटोपल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “गेली 50 वर्षही पद्धत्त आहे. पाडव्याच्या दिवशी लोक बारामतीत येतात. गेल्या काही वर्षांत त्यात वाढ झाली आहे. यंदाचं वर्ष वेगळं आहे. कारण यापूर्वी लोक पाडव्यासाठी यायचे, आता पाडव्यापूर्वी लोक येतात आणि सांगतात पाडव्याच्या दिवशी गर्दी खूप असते, त्यामुळे आम्ही आधीच येऊन भेटून जातो. आजकाल दोन दिवस आधीही लोक येतात. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, कोकण इथून लोक आले आणि शुभेच्छा दिल्या. यावर्षी अलेल्यांपैकी 70 टक्के लोक तरुण होते. हे या वेळचं वैशिष्ट्य. तरुणांच्या भवितव्यासाठी काय करता येईल त्याचा प्रयत्न करेन.”

 

मराठा तरुणांची भावना तीव्र, त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही : शरद पवार

 

मराठा आरक्षणाबाबतही शरद पवारांनी भाष्य केलं आहे. मराठा तरुणांची भावना तीव्र आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहचवण्याचं काम करू, असं म्हणत शरद पवारांनी मराठा समाजाला आश्वासनही दिलं आहे. पुढे बोलताना मराठा ओबीसीत वाद नाही, मात्र काही लोक तसं वातावरण तयार करत आहेत. लोकांचे न्याय प्रश्न मात्र सुटले पाहिजेत, असं ते म्हणाले. तसेच, मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती, त्या बैठकीला राज्यातील विविध पक्षांचे प्रमुख नेते होते. आरक्षणाच्या पुर्ततेची प्रक्रिया पुर्ण करतो, असं मुख्यमंत्री म्हणाले असल्याचंही शरद पवारांनी यावेळी बोलताना सांगितलं.

 

सगळ्या जगाला माहितीय माझी जात काय : शरद पवार

 

काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या जातीचा खोटा दाखला सोशल माध्यमांवर व्हायरल झाला होता. याबाबतही शरद पवारांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “माझा जातीचा बोगस दाखला व्हायरल झाला होता. माझा इंग्रजीमधील दाखला काही जणांनी फिरवला. त्यावर ओबीसी लिहलं होतं. जन्मानं दिलेली जात मी लपवत नाही. सगळ्या जगाला माहितीय आहे, माझी जात काय आहे.”

 

दरम्यान, आज शरद पवारांच्या गोविंद बागेत आज दिवाळी पाडवा पार पडला. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर गोविंद बागेत पहिलाच दिवाळी पाडवा पार पडला. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्याकडून शुभेच्छांचा स्वीकार करण्यात आला.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!