🟥 ईडब्ल्यूएस आरक्षण तुम्ही घ्या, 10 टक्के आरक्षण आम्हाला द्या; मनोज जरांगे पाटील यांचं ओबीसी नेत्यांना आव्हान
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴संभाजीनगर, दि-१२:- मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षण घेण्याचा हट्ट करू नये. त्यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र घेऊन आरक्षणही घेऊ नये. त्यातून त्यांना काहीच फायदा होणार नाही.ओबीसींनी ईडब्ल्यूएसमधून आरक्षण घ्यावं. त्यातून त्यांचा फायदाच होणार आहे, असा सल्ला ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी त्यावर ओबीसी नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्हीच ईडब्ल्यूएस आरक्षण घ्या आणि दहा टक्के आरक्षण आम्हाला द्या. ईडब्ल्यूएसचा एवढा फायदा होत असेल तर तुम्ही एवढी वाटणी कराच, असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिलं आहे.
मनोज जरांगे पाटील हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला. तुम्हाला तीन टक्केच आरक्षण मिळणार आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. कायदा म्हणतो लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिलं जातं. त्यामुळे आम्हाला 50 टक्के आरक्षण हवं. तेवढं आरक्षण आम्हाला मिळणार आहे. साडेतीन नाही फाडेतीन नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणार आणि आम्ही ते घेणार, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
येडं समजता व्हय आम्हाला
ईडब्ल्यूएसचं डबल डबल काढू नका. ते तुम्हाला घ्या आणि त्याबदल्यात 10 टक्के आरक्षण आम्हाला द्या. डोंगराचं वावर आम्हाला दिलं. जे वावर पिकत नाही ते दिलं आम्हाला. आणि काळी जमीन तुम्ही घेतली. येडं समजता व्हय आम्हाला. ज्यात औतच चालत नाही ते आम्हाला देत आहेत. तुम्हालाच घ्या ना ईडब्ल्यूएस. वाटण्या झाल्या आपल्या. 10 टक्के आरक्षण द्या आम्हाला, असं ते म्हणाले.
तारीख मागे पुढे नाही
दमानं का होईना पण आम्ही आरक्षण घेणारच. घेतल्याशिवाय राहणार नाही. 24 तारीख बदलण्याचा संबंध नाही. तारीख मागेपुढे होईल असं मी म्हटलं नाही. ते फक्त मराठा तरुणांसाठी म्हटलं होतं. आरक्षण देण्यासाठी मागं पुढे होईल पण जीव गमवावू नका असं आवाहन मी मराठा तरुणांना म्हटलं होतं, असंही त्यांनी सांगितलं.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

