Uncategorized

तळेरेत आकाश कंदील, चकली स्पर्धेचे आयोजन

तळेरेत आकाश कंदील, चकली स्पर्धेचे आयोजन

तळेरे

तळेरे येथे दीपावलीनिमित्त जिल्हास्तरीय आकाश कंदील स्पर्धा व महिलांसाठी चकली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्हीही स्पर्धा तळेरे येथे येत्या ११ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. होणार आहेत. विजेत्यांना रोख रकमेसह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धा असलदे येथील दीविजा वृद्धाश्रम, स्व. सुनील तळेकर ट्रस्ट, वाचनालय व प्रज्ञांगण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या आहेत. चकली स्पर्धेसाठी पहिल्या पंधरा महिलांना स्पर्धेत सहभागी करून घेतले जाणार आहे. स्पर्धेला येताना चकली घेऊन यावी. स्पर्धेसाठी आकर्षकपणा येण्यासाठी सजावटीचे साहित्य स्पर्धकाने घेऊन यावे. तीन विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल. जिल्हास्तरीय आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत आकाश कंदील पर्यावरणपूरक असला पाहिजे. दीड फूट उंचीचा असला पाहिजे. थर्माकोल, प्लास्टिक याचा वापर टाळावा. तीन विजेत्यांना अनुक्रमे १००१, ७०१ व ५०१ रुपये तसेच उत्तेजनार्थ दोन विजेत्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल. ९ नोव्हेंबरपर्यंत प्रा. हेमंत महाडिक, निकेत पावसकर, कलाशिक्षक पी. एन. काणेकर, श्रावणी कंप्युटर एज्युकेशन, तळेरे येथे करावी. स्पर्धेत स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!