पोलीस पाटील भरती अर्जासाठी १३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
पोलीस पाटील भरती अर्जासाठी १३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
कणकवली
कणकवली उपविभागातील म्हणजे कणकवली, देवगड व वैभववाडी तालुक्यातील १३४ पोलीस पाटील पदांच्या भरतीसाठी अर्ज विक्री स्वीकारण्याची मुदत १३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती उपविभागीय दंडाधिकारी तथा पोलीस पाटील पदभरती प्रक्रिया समिती कणकवलीचे अध्यक्ष जगदिश कातकर यांनी दिली.’ यात कणकवली तालुक्यातील
५२, वैभववाडी तालुक्यातील ३७ व देवगड तालुक्यातील ४५ पोलीस पाटील पदांचा समावेश आहे. यासाठी अर्ज शुल्क २५ रुपये असून परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी ४०० रु., तर मागास प्रवर्गासाठी ३०० रुपये आहे. भरती प्रक्रियेसाठी अर्ज विक्री व स्वीकारण्यासाठी १० ते १२ नोव्हेंबर दरम्यान सुट्टी असल्याने १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वा. तहसीलदार कार्यालयांत अर्ज स्वीकारण्यात येतील.

