आडेलीतील युवकाची गळफासाने आत्महत्या
आडेलीतील युवकाची गळफासाने आत्महत्या
वेंगुर्ले
आडेली-भंडारवाडी येथील रहिवासी वसंत उर्फ समीर अरुण सावंतं (३०) या युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
आडेली-भंडारवाडी येथील रहिवासी वसंत उर्फ समीर अरुण सावंत हा राहत्या घराच्या छपराच्या लोखंडी बारला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. ही घटना मंगळवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजण्याच्या मुदतीत घडली. त्याचे काका रमाकांत वसंत सावंत सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर त्यांच्या ही घटना निदर्शनास आली. त्यानुसार त्यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात खबर दिली. वेंगुर्ले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सराफदार करत आहेत.

