श्रीराम वाचन मंदिरतर्फे दिवाळी अंक प्रदर्शन
श्रीराम वाचन मंदिरतर्फे दिवाळी अंक प्रदर्शन
सावंतवाडी
दरवर्षीप्रमाणे सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरतर्फे वाचकांसाठी दिवाळी सभासद, अंक योजना सुरू करण्यात येत असून सदर दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार १० नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता साहित्य अकादमीप्राप्त साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या हस्ते होणार आहे. या योजनेंतर्गत दर्जेदार ६० ते ७० दिवाळी अंक १०० रुपये वर्गणीत १० नोव्हेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीत वाचकांना घरी वाचण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. या ” दिवाळी अंक योजनेचा जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष अॅड. संदीप निंबाळकर आणि सचिव रमेश बोंद्रे यांनी केले आहे.
