🟥 विशाल बागायतदार यांचे अर्चना घारे परब यांनी अभिनंदन करत सत्कार केला व यशस्वी वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०८:- नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष श्री. विशाल बागायतदार हे ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यांनी सावंतवाडी येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांच्या जनसंपर्क कार्यालयात येऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी श्री.विशाल बागायतदार यांचे अभिनंदन करत सत्कार केला व यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी नवनिर्वाचित सदस्यांकडून सर्वसामान्य लोकांची सेवा घडो, ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार घरा-घरात पोहोचवावे, गरजवंतांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन ,सौ.अर्चना घारे परब यांनी यावेळी केले.
यावेळी वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, प्रसाद जबडे, ज्ञानेश्वर केणी, अंकुश नाईक, सुनील जबडे, आनंद जबडे, चंद्रकांत परब, गोविंद नाईक, ओंकार कोरगावकर, कृष्णा नाईक, साहिल नाईक आदी सहकारी उपस्थित होते.

