बांद्यात मुसळधार पावसामुळे भातशेतीचे नुकसान
बांद्यात मुसळधार पावसामुळे भातशेतीचे नुकसान
बांदा
बांदा परिसरात सोमवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. सलग दोन तास पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान झाले. तीन महिने केलेली मेहनत करुन केलेली भातशेती अवकाळी पावसामुळे वाया गेल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले.सोमवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास पावसाची चाहूल लागताच भात वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली. मात्र, काही वेळातच विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस सुरू झाला. बघता-बघता भातशेती पाणी साचल्याने कापलेले भातपीक पाण्यात तरंगू लागले. सलग दोन तास पाऊस झाल्यामुळे शेकडो एकरवर कापलेल्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले.

