कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसावंतवाडी

मळेवाड भटवाडी येथे उद्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

मळेवाड भटवाडी येथे उद्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

न्हावेली

श्री ब्राह्मणदेव दत्तप्रसाद कला क्रीडा मंडळातर्फे मळेवाड-भटवाडी येथे रविवार ५ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता उद्घाटन व ७ वाजल्यापासून भजन स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
यात सायंकाळी ७ वाजता श्री रवळनाथ नवतरुण प्रासादिक भजन मंडळ, ओटवणे (बुवा आत्माराम कवठणकर), सायंकाळी ७.४५ वाजता श्री साटम महाराज प्रासादिक भजन मंडळ, निरवडे (बुवा नरेंद्र बोंद्रे), रात्री ८.२५ वाजता श्री देव इसोटी प्रासादिक भजन मंडळ, मातोंड सावंतवाडा (बुवा सचिन सावंत), रात्री ९.१५ वाजता श्री देव मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ, नेरुर (बुवा भार्गव गावडे), रात्री ९.५० वाजता श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी (बुवा प्रसाद आमडोसकर), रात्री १०.४० वाजता
श्री कलेश्वर पूर्वीदेवी प्रासादिक भजन मंडळ, वेत्ये (बुवा प्रथमेश निगुडकर), रात्री ११.२० वाजता श्री देव गोठण प्रासादिक भजन मंडळ, वजराट (बुवा सोमेश वेंगुर्लेकर), रात्री १२.१५ वाजता श्री देवी माऊली प्रासादिक भजन मंडळ, साटेली (बुवा सत्यनारायण कळंगुटकर) हे संघ सहभागी होणार आहे. प्रथम पारितोषिक ५००० रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक ३००० रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच उत्कृष्ट हार्मोनियम ५०१ रुपये व सन्मानचिन्ह, उत्कृष्ट गायक ५०१ रुपये व सन्मानचिन्ह, उत्कृष्ट पखवाज ५०१ रुपये व सन्मानचिन्ह, उत्कृष्ट तबला ५०१ रुपये व सन्मानचिन्ह, उत्कृष्ट झांज ५०१ रुपये व सन्मानचिन्ह, उत्कृष्ट कोरस ५०१ रुपये व सन्मानचिन्ह अशी पारितोषिके आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!