🟥 बारावीच्या विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेवर लिहीले ‘एक मराठा कोटी मराठा’! सोलापूर जिल्ह्यातील बीबी दारफळच्या विद्यार्थ्याची राज्यभर चर्चा..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴वडाळा, दि-०५:- मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे- पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणाला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला. आंदोलनाच्या माध्यमातून ते घराघरात पोचले. आता त्यांची क्रेझ शाळा- महाविद्यालयातही पहायला मिळत आहे.इयत्ता बारावीच्या सहामाही परीक्षेतील राज्यशास्त्राचा पेपर सोडविताना बीबी दारफळ येथील विद्यार्थ्याने ‘एक मराठा एक कोटी मराठा’ अशी सुरुवात करूनच उत्तरपत्रिका सोडविली आहे.
बी.बी. दारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथील आदर्श शिक्षण मंडळ बीबीदारफळ प्रसारक संचलित. श्री गणेश विद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयात संकेत लक्ष्मण साखरे (वय १९) हा बारावीत शिक्षण घेत आहे. त्याने सहामाहीचा पेपर सोडविताना उत्तरपत्रिकेची सुरवात चक्क ‘एक मराठा कोटी मराठा’ असे लिहून केली.बी. बी. दारफळ येथील संकेत लक्ष्मण साखरे याचा गुरुवारी (ता. २) सहामाही परीक्षेचा राज्यशास्त्र विषयाचा पेपर होता. पेपरची सुरुवातच त्याने ‘जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, एक मराठा कोटी मराठा’ असे लिहून केली. त्याची उत्तरपत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल हो आहे.
नोकरीसाठी आयटीआयनंतर बारावीत प्रवेश
संकेत साखरे या विद्यार्थ्याने दहावीनंतर आयटीआय शिक्षण घेतले आहे. तो सध्या लोकमंगल डिस्टलरी या प्रकल्पात कामगार म्हणून काम करीत आहे. शिक्षणाची इच्छा असल्याने तो काम करून बी.बी. दारफळ (ता. उत्तर सोलापूर) येथे शिक्षण घेत आहे. २००८ मध्ये वडिलांचे छत्र हरपले. सध्या त्याच्या कुटुंबात आई आणि भाऊ आहेत.
शेती अडचणीत, नोकरी नाही, करायचे काय…
मराठा समाजातील तरुणांना चांगले मार्क मिळूनही चांगली नोकरी मिळत नाही. शेती केली तरी शेतीतून शाश्वत उत्पन्न येत नाही. शेतमालाचे भाव चढ-उतार यामुळे शेती तोट्यात जाते. शेतजमीन असूनही पोटाची खळगी भरण्यासाठी इतरत्र काम करावे लागते, अशी खंत संकेत साखरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास आमची परवड थांबेल, अशी आशाही त्याने यावेळी व्यक्त केली.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

