कणकवलीकोकणमहाराष्ट्र

सांगवेतील घरफोडी प्रकरणी दोन महिलांना अटक

सांगवेतील घरफोडी प्रकरणी दोन महिलांना अटक

कणकवली

सांगवे – संभाजीनगर येथील जयश्री पुंडलिक सावंत (५७, सध्या रा. मुंबई व मुळ रा. सांगवे) यांचा बंद बंगला फोडून टीव्ही, वॉशिंग मशिन, अगदी ठिकठिकाणी लावलेले नळ वगैरे मिळून ५४ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याबाबत अंजली गणेश कुबडे (२९, हरकुळ बुद्रुक) व पूजा विश्वनाथ गावडे (२२, वागदे) या दोन महिलांना कणकवली पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक वृषाली बरगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अटक केली. दोघांनाही गुरुवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सदरची बंगलाफोडी १३ ऑक्टोबरला उघडकीस आली होती. जयश्री कुटुंबियांसह मुंबईला असल्याने त्यांचा सांगवे संभाजीनगर येथील बंगला बंदचअसतो. १३ ऑक्टोबरला परिसरातील एकाने पाहिले असता हा बंगला फोडलेल्या स्थितीत आढळला. त्यानंतर जयश्री यांनी बंगल्याची पाहणी केली असता बंगल्यातील बरेच साहित्य चोरीस गेल्याचे आढळले. यात इन्व्हर्टर बॅटरी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशिन, गॅस सिलेंडर, प्लास्टिकच्या सहा खुर्च्या, तीन इलेक्ट्रीक गिझर, स्टीलचे २० नळ, पंचधातूचे तीन देव, इलेक्ट्रीक शो पीस, क्लज टँक, चार कुकर, चारअॅल्युमिनिअमचे टोप, दोन मोठ्या स्टीलच्या परात, प्लेट, डिनरसेट, वाट्या, चमचे, दहा साड्या, पाच ड्रेसचा समावेश होता.
या बंगलाफोडीत अंजली कुबडे हिचा सहभाग असल्याची माहिती उपनिरीक्षक वृषाली बरगे यांनी गुप्त माहीतगाराद्वारे मिळाली. त्यानुसार त्यांनी अंजली हिला बुधवारी अटक केली. तर पूजा हिचाही सहभाग स्पष्ट झाल्याने तिलाही गुरुवारी सकाळी अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!