कंपनीच्या नावे बनावट पत्रे विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल
कंपनीच्या नावे बनावट पत्रे विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल
कणकवली
जेएसडब्ल्यू कंपनीच्या नावाने बनावट पत्रेविक्री करणाऱ्या रोहित विष्णू शेटये (३१, करुळ फोपेवाडी) याच्यावर अखेर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जेएसडब्ल्यू कंपनीने चौकशीचे अधिकार दिलेल्या ईआयपीआर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीचे तपासी अधिकारी सागर अशोक आबनवे (३९, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित रोहीत याचे वागदे पुलानजीक गोडावून आहे. रोहित हा जेएसडब्ल्यू कंपनीच्या नावाने बनावट पत्रेविक्री करत असल्याच्या तक्रारी कंपनीकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार तपासणी केली असता जेएसडब्ल्यू कंपनीच्या ..नावाने बनावट पत्रेविक्री करत असल्याचे निष्पन्न झाले होते. तब्बल एक लाख ३६ हजार ६२० रुपये किमतीचे बनावट पत्रे आढळून आले.

