अच्युत सावंत भोसले यांची डॉ. माशेलकर यांच्याशी भेट
*🟥अच्युत सावंत भोसले यांची डॉ. माशेलकर यांच्याशी भेट*
*🟥सिंधुदुर्गात विद्यार्थ्यांशी लवकरच संवाद : भोसले नॉलेज सिटीच्या कार्याची घेतली माहिती*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.०३:* आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांची सावंतवाडीच्या भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांनी पुणे येथे सदिच्छा भेट घेतली. कोकणातील विद्यार्थ्यांसाठी संस्था करत असलेल्या कामाची माहिती देणे व विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेटिव्ह रिसर्चची आवड निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन प्राप्त करणे हा या भेटीमागचा उद्देश होता. या वेळी त्यांच्यासोबत मुंबई दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक जयू भाटकर व डॉ. सचिन क्षीरसागर उपस्थित होते.
डॉ. माशेलकर हे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्वज्ञ व थोर मानवतावादी विचारवंत आहेत. ते वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (C.S.I.R.) या
संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. भारताच्या विविध विज्ञान व तंत्रज्ञानविषयक धोरणांना योग्य आकार व दिशा देण्याचे महत्कार्य त्यांनी केले आहे. हळद, बासमती आणि कडुनिंब यांच्या पेटंट्सबाबतचा लढा यशस्वीपणे लढवून अमेरिकेकडून ही ही पेटंट्स परतमिळविण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले आहे. त्यांना आजमितीपर्यंत साठहून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. डॉ. माशेलकर यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांची सुमारे वीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
व्यवसायाभिमुख संशोधन’ या त्यांच्या तत्वाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा, त्यासंबंधीचे त्यांचे मार्गदर्शन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी अच्युत भोसले यांनी या भेटीत त्यांना विनंती केली. जिल्ह्यातील विद्यार्थी गुणवंत व सृजनशील आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास येथेही प्रतिभावंत शास्त्रज्ञ व वैज्ञानिक घडू शकतात, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. माशेलकर यांनी भोसले नॉलेज सिटीच्या कार्याची बारकाईने माहिती घेतली व आपला जन्म गोव्याचा असून शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांशी हितगुज साधायला आपणाला नक्की आवडेल, असे सांगितले. येणाऱ्या काही दिवसात आपल्या दौऱ्याची तारीख कळवू असे आश्वासनही त्यांनी भोसले यांना दिले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

