युवतीला मारहाणप्रकरणी संशयिताला जामीन मंजूर
युवतीला मारहाणप्रकरणी संशयिताला जामीन मंजूर
सावंतवाडी
प्रेमसंबंधातून युवतीच्या डोक्यावर हातोडी मारून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी संशयित मनोहर अशोक याला जिल्हा गवस न्यायालयाने २५ हजाराचा जामीन मंजूर करून जामिनावर मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड. स्वप्नील कोलगावकर व अॅड. संकेत नेवगी यांनी काम पाहिले. फिर्यादी हिने आरोपी मनोहर अशोक गवस याच्याविरोधात २ मे रोजी फिर्याद दिली. आरोपीने १ मे रोजी सायंकाळी ४.१५ च्या सुमारास फिर्यादी ही त्यांच्या काजू बागेत काजू गोळा करत असताना आधीपासुनच तेथे येऊन थांबलेल्या आरोपीने तिला ‘तू माका लग्न करता करता म्हणोन आतामेरेन फसयता. तुझो जीवच घेता’, असे म्हणून मारण्याच्या उद्देशाने सोबत आणलेल्या लोखंडी हातोडीने डोक्यावर व हातावर मारून
दुखापत केली. तसेच आरोपीने सोबत आणलेल्या प्लास्टिक बॉटलमधील पेटोल किंवा किलसारखा द्रवपदार्थ फिर्यादीच्या अंगावर शिंपडून तिला लायटरच्या सहाय्याने पेटवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आरोपीविरोधात दोडामार्ग पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीच्यावतीने जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज सादर करण्यात आला होता. सदर जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान युक्तीवाद करताना अॅड. स्वप्नील कोलगावकर यांनी सदर गुन्ह्याशी आरोपीचा काहीही संबंध नाही. आरोपीला खोट्या केसमध्ये अडकविल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, असा युक्तीवाद केला. सदरकामी कोर्टासमोर आलेल्या वस्तुस्थितीवरून आरोपीची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

