🟥 हालचालींना वेग, फडणवीस घेणार अमित शाहांची भेट..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मुंबई, दि-०२:- राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. आरक्षणाबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.आज दुपारी साडेतीन वाजता महत्त्वाची बैठक आहे. बैठकीत नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणासाठी चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. मात्र चाळीस दिवसांत आरक्षण न मिळाल्यानं मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. दुसरीकडे या आंदोलनाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला विविध पक्षातील 32 नेते हजर होते. या बैठकीमध्ये मराठा आरक्षणावर महत्त्वाची चर्चा झाली.
शिष्टमंडळ घेणार जरांगे पाटलांची भेट
दरम्यान दुसरीकडे या सर्व पक्षीय बैठकीनंतर आता राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. ओबीसी व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, आमदार नारायण कुचे यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. जरांगे पाटील यांना शिष्टमंडळाच्या वतीनं सर्वपक्षीय नेत्यांच्या ठरावाची प्रत देण्यात येणार आहे. तसेच आरक्षणासाठी सरकारला थोडा वेळ देण्यात यावा त्यासाठी उपोषण मागे घ्यावं, अशी विनंतीही हे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना करणार आहे. तर दुसरीकडे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

