कणकवलीकोकणमहाराष्ट्र

तोंडवळी – सापळे बाग मार्गावर एसटी बस सुरू करा!

*🟥तोंडवळी – सापळे बाग मार्गावर एसटी बस सुरू करा!*

*🟥भिकाजी गोलतकर यांची मागणी*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 मालवण, दि.०१:* वायंगणी बौद्धवाडी येथून कामतबाग, सापळेबाग, मुंजाचे बाग मार्गे तोंडवळी या प्रस्तावित असलेल्या रस्त्याचे काम बऱ्याच काळानंतर अलिकडेच आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मार्गी लागले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील दुर्गम वाड्यांनाही वाहतूक मार्ग उपलब्ध झाला आहे. या रस्त्यावरून एसटी बस सुरू करावी, अशी मागणी सापळेबागवासीयांनी केली आहे. त्यानुसार एसटीच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याचे सर्वेक्षण केले आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता वाहतूक योग्य असल्याचा दाखला एसटी प्रशासनाकडे दिला आहे. या मार्गावर बस सेवा सुरू करताना तोंडवळी ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन एसटी बस सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मालवण तालुक्यातील तोंडवळी येथील वाघेश्वर मंदिर येथे बसथांब्याला परिवहन विभागाची मान्यता आहे मात्र या ठिकाणी एसटी बसेस नेण्यास कणकवली आगाराचे वाहक चालक टाळाटाळ करतात.परस्पर तोंडवळी व शाळेकडून तळाशील येथे गाड्या मार्गस्थ करतात. या बसथांब्याची या मार्गावरील वाहक व चालकांना कल्पना देण्यात यावी व या थांब्यावर बसेस नेण्याच्या सक्त सूचना संबंधितांना द्याव्यात, अशी तोंडवळी समाजसेवा केंद्रातर्फे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली आहे. या थांब्यावर एसटी नेण्यास वाहक-चालकांनी जाणून-बुजून टाळाटाळ केल्यास निवेदनाचा सनदशीर मार्ग सोडून कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा देतानाच कालावल-तोंडवळी श्री वाघेश्वर मंदिर मार्गावर पहिली बस १७ एप्रिल १९८६ रोजी धावली होती. ती आतापर्यंत सुरू होती. मात्र, रस्ता नादुरुस्त झाल्याने अनेकदा अडचणी आल्या होत्या. तोंडवळी वाघेश्वर मंदिर येथे बस थांब्याचा बोर्ड प्रशांत लाड यांच्या सौजन्याने लावण्यात आला आहे. एसटी प्रशासनाने तातडीने या मार्गावर गाडी सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भिकाजी विश्राम गोलतकर यांनी केली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!