कणकवलीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसिंधुदुर्ग

🟥 विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे वाचन करून आपल्या विचारांना समृद्ध करावे ; दिलीप तळेकर

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग* .

🎴तळेरे, दि-३१:– आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांना वैचारिक दृष्ट्या सक्षम बनायचे असेल तर त्यांनी पुस्तके वाचन करून आपल्या विचारांना समृद्ध करावे असे प्रतिपादन माजी सभापती व शाळा स.सदस्य दिलीप तळेकर यांनी केले.वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालयच्या एम. डी. देसाई सांस्कृतिक भवनात प्रशालेचे प्राध्यापक व्ही. डी. टाकळे यांच्या इंग्रजी व्याकरण पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तळेरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर, माजी विस्तार अधिकारी सुहास पाताडे, शाळा स. सदस्य प्रवीण वरूणकर, निलेश सोरप, लेखक-कवी प्रमोद कोयंडे, वारगांव हायस्कूल मुख्या. हनुमंत वाळके, नांदगाव हायस्कूल मुख्या. सुधिर तांबे, पत्रकार निकेत पावसकर, गवाणे हायस्कूलचे शिक्षक बारटक्के, प्राचार्य अविनाश मांजरेकर,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यालयातील विद्यार्थी इंग्रजी व्याकरणात समृद्ध होण्यासाठी तळेरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर यांनी 50 पुस्तके खरेदी करून विद्यालयातील होतकरू विद्यार्थ्यांना वाटप केले. पुस्तक हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात त्यांना कल्पना शक्तीच्या जगाची ओळख करून देऊन बाहेरील जगाचे ज्ञान प्रदान करते, त्यांचे वाचन लेखन आणि बोलण्याचे कौशल्य सुधारते तसेच स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता वाढवते, असे प्रतिपादन माजी विस्ताराधिकारी सुहास पाताडे यांनी केले.
पुस्तक म्हणजे ज्ञानाचे भांडार, पुस्तके आपल्याला निस्वार्थी भावनेने अनेक चांगल्या गोष्टी शिकवतात, त्यांच्या साह्याने आपल्यातल्या कमतरता खोडून आपली बलस्थाने बळकट करा असे प्रतिपादन महसूल विभागाचे प्रदीप कदम यांनी केले.
विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत इंग्रजी व्याकरणाचे पुस्तक प्रशालेचे प्राध्यापक व्हि.डी. टाकळे यांनी लिहिल्याबद्दल प्रशाला व संस्थेच्या वतीने प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी त्यांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय आपला वाटावा, इंग्रजी बोलण्यास विद्यार्थी सक्षम व्हावेत हा हेतू मनात ठेवूनच पुस्तक रचना करणे गरजेचे वाटले असे मनोगत व्ही. डी. टाकळे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. शिक्षिका एस.यु. सुर्वे यांनी तर शेवटी आभार एस.एस.पडवळ यांनी मानले.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!