🟥 कणकवलीत भरणार समीर नलावडे मित्रमंडळ आयोजित दिवाळी बाजार..
🟥 ६ ते ११ नोव्हेंबर पर्यंत कालावधी; आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव
🎴कणकवली, दि-३०:- दिवाळी निमित्त समीर नलावडे मित्रमंडळ मार्फत या वर्षी देखील दिवाळी बाजार भरविण्यात येणार आहे. कणकवलीत पेट्रोल पंपासमोर फ्लाय ओव्हर ब्रिज खाली हा दिवाळी बाजार 6 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर या कालावधीत भरणार आहे. 6 रोजी सायंकाळी 5.30 वाजता या बाजाराचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते केले जाणार आहे. करण्यात येणार आहे. अशी माहिती कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
कणकवली येथे भाजप कणकवली शहर कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत समीर नलावडे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक अभिजीत मुसळे, जावेद शेख, सागर होडावडेकर, नवू झेमणे, राजा पाटकर, पंकज पेडणेकर, आदी उपस्थित होते
अस्सल घरी बनविलेल्या वस्तू य दिवाळी बाजारात मिळणार आहेत. बचत गटाच्या माध्यमातून बनविण्यात येणारा फराळ, मेणबत्ती, आकाश कंदील हस्तकलेतून साकारणाऱ्या वस्तुंना या बाजारात व्यासपीठ म्हणून हा उपक्रम राबवीण्यात येणार आहे. तसेच कुंभार बांधवांनी बनविलेल्या मातीच्या वस्तू देखील या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. या वस्तू साठी 10 स्टॉल लावण्यात येणार आहेत. तसेच मातीच्या वस्तू बनविण्याचा लाईव्ह डेमो अनुभवता येणार आहे. एकूण 32 स्टॉल या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. या ठिकाणी लाईट व्यवस्था नगरपंचायत मार्फत करणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.
गेल्या काही वर्षांत दिवाळी बाजार ही जिल्ह्यातील पहिली संकल्पना राबविण्यात येत आहे. सर्व सुविधा मोफत दिली जाणार आहे. बचत गटांच्या स्टॉलवर घरगुती फराळ, कागदी आकाश कंदील, आदी घरगुती वस्तू प्रदर्शन व विक्री केली जाणार आहे. 6 ते 11 नोव्हेंबर पर्यंत हा बाजार असणार आहे. घरगुती बनविलेल्या दिवाळी साठीच्या वस्तू ची विक्री येथे असणार आहे. या सर्व विक्रेत्यांची स्टॉल ची व्यवस्था मोफत करण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करावी या उद्देशाने हे आयोजन केल्याचे सांगण्यात आले. या स्टॉल साठी नाव नोंदणी जावेद शेख, सागर होडावडेकर, नवू झेमणे 8625922454, राजा पाटकर 9860380738, पंकज पेडणेकर 9890030289, अण्णा कोदे यांच्याकडे करावी. सत्ता नसताना देखील आम्ही राबवलेले उपक्रम सुरू ठेवले असे समीर नलावडे यांनी सांगितले.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

