कणकवलीकृषिकोकणमहाराष्ट्र

जिल्हा कृषी कार्यालयाला एक नोव्हेंबरला टाळे ठोकणार!

*🟥जिल्हा कृषी कार्यालयाला एक नोव्हेंबरला टाळे ठोकणार!*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.३०:* आंबा व काजू पीकविमा योजनेत राज्य व केंद्र शासनाने आपल्या हिश्श्याचा विम्याचा ५३ कोटींचा हप्ता विमा कंपनीकडे वर्ग न केल्याने शेतकरी पीकविमा नुकसान भरपाईपासून वंचित आहेत. यापूर्वी आंदोलने करून निवेदने देऊनही सरकार लक्ष देत नसल्याने एक नोव्हेंबरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडून सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिला आहे. गतवर्षीची शेतकऱ्यांच्या नुकसानीची सुमारे १२० कोटीची रक्कम प्रलंबित आहे. ही रक्कम गणपतीपूर्वी मिळावी, यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आंदोलन केले होते. त्याचबरोबर सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. राज्याच्या कृषीमंत्र्यांचे लक्ष वेधल्यानंतर गणपतीपूर्वी विमा रक्कम देण्याची ग्वाही त्यांनी दिली होती. मात्र, आता फळपिकांचा नवीन हंगाम सुरू व्हायला आला तरीदेखील विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. औषध फवारणी, झाडांची देखभाल करण्यासाठी लागणारे पैसे शेतकऱ्यांकडे नाहीत. आंबा व काजू पीकविमा योजनेत केंद्र व राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचे ५३ कोटी रुपये अद्याप भरलेले नाहीत. या योजनेत शेतकऱ्यांनी आपल्या हप्त्यापोटी ११ कोटी भरले आहेत. जिल्ह्यात आंबा व काजू पिकांसाठी सन २०२२ २३ मध्ये ३८ हजार ४६७ शेतकरी सहभागी झाले आहेत. एक डिसेंबर २०२२ पासून विमा संरक्षणाचा कालावधी सुरू झाला. हा कालावधी १५ मे २०२३ पर्यंत होता. शासन निर्णयानुसार पीक विम्याचा कालावधी संपल्याच्या ४५ दिवसानंतर अर्थात एक जुलैदरम्यान पीकविमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देणे क्रमप्राप्त होते. मात्र, अद्याप ही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!