🟥 भिरवंडे येथील वनपाल सत्यवान सुतार निलंबित..
🟥 उपवनसंरक्षकांची कारवाई, बोगस पास विक्री केल्याचा ठपका..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली, दि-२९:– सावंतवाडी, माणगाव नंतर आता कणकवली तालुक्यात बोगस पास विक्री प्रकरण उघड झाले आहे. तसा ठपका ठेवून भिरवंडे येथील वनपाल सत्यवान सुतार यांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी केली. याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी पुराव्यानिशी केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
भिरवंडे वनपाल सत्यवान सुतार यांच्याबाबत बोगस पास विक्री यासह अनेक तक्रारी उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्याकडे दाखल झाल्या होत्या. माहिती अधिकारात माहिती मिळवत आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी याबाबत रीतसर तक्रार दाखल केली होती. सत्यवान सुतार यांनी दिलेला पास हा वाहन क्षमतेपेक्षा तिप्पट क्षमतेचा होता, तसेच संबंधित पासवर लाकूड सामान वाहतूक करणाऱ्या वाहना ऐवजी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचा फोटो लावला होता. हीबाब विवेक ताम्हणकर यांनी पुराव्यानिशी उघड केली होती. सत्यवान सुतार हे यापूर्वी सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथे वनरक्षक म्हणून कार्यरत असताना अवैध वृक्षतोड प्रकरणी निलंबित झाले होते. सुतार यांच्या बाबत स्थानिक शेतकरी व व्यापारी यांच्यामध्ये तीव्र नाराजी होती. सुतार यांच्या अवैध व नियमबाह्य कृतीमुळे कणकवली वनविभाग चर्चेत आला होता. तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध लाकूडतोड आणि पास विक्री प्रकरणाची देखील चर्चा होत होती.
दरम्यान निलंबनानंतर सुतार यांना वनक्षेत्रपाल कार्यालय दोडामार्ग येथे निलंबन कालावधीत मुख्यालय देण्यात आले आहे. तर शासकीय नियमानुसार त्यांना जिल्ह्याबाहेर मुख्यालय देणे आवश्यक असून याबाबत आपण पाठपुरावा करणार असल्याचे आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर म्हणाले आहेत.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

