क्राइमसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

टेम्पो चालकावरील खूनी हल्ल्यातील दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश..

▪️जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे व जिल्हा पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखालील धडक कारवाई..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : साईश गावडे

🎴सावंतवाडी,दि.१२: शहरात आज गवळी तिठा येथे कोल्हापूर येथून फरशी भरून आलेल्या आयशर टेम्पो चालकावर झालेल्या खूनी हल्ल्यात चंदन सनी अडेलकर (वय २७ रा. माजगाव) व अक्षय अनंत भिके (वय २६ रा. मापसा-गोवा) या दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे व जिल्हा पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अवघ्या काही तासात यश आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज कोल्हापूर येथून फरशी भरून आलेल्या आयशर टेम्पो चालकावर माजगाव येथील चंदन सनी आडेलकर व मापसा-गोवा येथील अक्षय अनंत भिके या दोघांनी मिळून आयशर टेम्पो चालकाच्या पोटात चाकू खुपसून प्राणघातक हल्ला करून त्या चालकाजवळ पैसे नसल्याने त्याच्या जवळील मोबाईल चोरी करून पसार झाले होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे व जिल्हा पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासात दोन्ही आरोपींना खुनी हल्ल्यात वापरण्यात आलेल्या डिवो टू व्हीलर गाडी सहित ताब्यात घेण्यात यश आले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके, पोलीस अंमलदार सुधीर सावंत, अरविंद गंगावणे, प्रकाश कदम, प्रमोद काळसेकर, चंद्रकांत पालकर, ज्ञानेश्वर कांदळगावकर, प्रवीण वालावलकर आदींनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळून धडक कारवाई केली.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!