बांदा येथे २९ रोजी साईबाबा उत्सव
बांदा येथे २९ रोजी साईबाबा उत्सव
बांदा
बांदा येथील काणेकर कुटुंबियांतर्फे शनिवार २९ ऑक्टोबरला कोजागरी पौर्णिमेला श्री साईबाबा उत्सव साजरा होणार आहे. सकाळी १० वाजता श्री साईबाबांची महापूजा, १२ वाजता आरती, १ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजल्यापासून तीर्थप्रसाद, रात्री ९ वाजता पहिल्या सत्रात गोव्यातील भजनी गायक पांडुरंग राऊळ, विठ्ठल
शिरोडकर, प्रल्हाद गावस, मिलिंद परब व मोहन पेडणेकर यांचा पारंपरिक भजनाचा कार्यक्रम होईल. दुसऱ्या सत्रात रात्री ११ वाजता पुणे येथील सौरभ काडगावकर यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होईल. त्यांना तुळशीदास नावेलकर (तबला) व राया कोरगावकर (हार्मोनियम) साथसंगत करतील. त्यानंतर तिसऱ्या सत्रात गोवा येथील सम्राज्ञी शेलार यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

