कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

ग्रामीण भागातील एसटी प्रवाशांना चांगली सेवा द्या!

*🟥ग्रामीण भागातील एसटी प्रवाशांना चांगली सेवा द्या!*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.२४:* सावंतवाडी, दोडामार्ग भागातील एसटी बसेस वेळेत सोडण्याच्या मागणीसाठी भाजपचे शिष्टमंडाने सोमवारी माजी आमदार राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली एसटी विभागाचे नियंत्रक अभिजीत पाटील यांच्याशी सावंतवाडी आगारात बैठक घेतली. एसटी बसेस वेळेत सोडण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. एसटीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील लोकांना चांगली सेवा द्या. विशेष करुन वेळेत गाड्या सोडा, मुलांचे नुकसान होऊ, नये यासाठी वस्तीच्या गाड्या नियमित करा, अशी मागणी भाजपच्या माध्यमातून माजी आमदार राजन तेली यांनी एसटीचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांच्याकडे केली.
दरम्यान या ठिकाणी राजकीय लोकांनी विरोध केला म्हणून कोणत्याही गाड्या थेट बंद करू नका. तर तेथील प्रवाशांची मते आणि भारमान लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्या, अशा सूचना त्यांनी यावेळी एसटी प्रशासनाला दिल्या.
तेली यांच्या उपस्थितीत सावंतवाडी एसटी आगारात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एसटीचे अधिकारी पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले तालुक्यातीलग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्या आणि तेथील राजकीय आणि प्रवाशांकडून करण्यात आलेल्या मागण्या लक्षात घेता त्यांनी मागणीनुसार आढावा घेतला. यावेळी काही गाड्या तेथील सरपंचांनी नकार दिल्याने बंद करण्यात आल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत तेली यांनी नाराजी व्यक्त केली. अशा पद्धतीने गाड्या बंद करणे चुकीचे आहे. प्रवाशांची मते आणि भारमान लक्षात घेऊन निर्णय घ्या, अशा सूचना दिल्या.यावेळी एसटीचे आगार प्रमुख नीलेश गाबीत, स्थानक प्रमुख विशाल शेवाळे यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक रवी मडगावकर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेगवी, दिलीप भालेकर, सुहास गवंडळकर, विनोद सावंत, परिक्षित मांजरेकर, शिरशिंगे सरपंच दिलीप राऊळ, अमित राऊळ, प्रशांत देसाई, संजय राऊळ, राजेंद्र सावरवाडकर आदी उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_

*🏬Ready Possession Flat’s Available*

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777

*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg

———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!