मसुरीत विहिरीत पडून १४ रानडुकरांना जलसमाधी
मसुरीत विहिरीत पडून १४ रानडुकरांना जलसमाधी
सर्व रानडुकरे पूर्णतः सडलेली वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने त्याच विहिरीत केले तर दफन
मसुरे
मार्गाचीतड येथील गणेश मंदिरनजीक, कठडा नसलेल्या विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून १४ रानडुकरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत माहिती मिळताच वन विभागाचे कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, मालवण वनपाल श्रीकृष्ण परीट हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व मृत डुकरांना वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्याने त्याच विहिरीत दफन केले.. सर्व रानडुकरे पूर्णपणे सडून गेली होती. यावेळी सहाय्यक पशुधन विकास अधिकारी अनंत शिरसाट, पशुधन पर्यवेक्षक नीलेश पवार उपस्थित होते.येथील सुषमा परब आणि कुटुंबियांच्या मालकीच्या जमिनीत कठडा नसलेली विनावापर विहीर आहे. सुमारे आठ दिवसांपूर्वी या विहिरीनजीक काही तरी पडल्याचा आवाज. आला होता. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले विहिरीतून दुर्गंधी येऊ लागल्यावर विहिरीत डोकावून पाहिले असता सर्व रानडुकरे मृत झाल्याचे दिसून आले.
*मृत डुकरांचे दफन*
याबाबत अशोक सांडव यांनी वन विभागाला कळविले वनक्षेत्र पाल संदीप कुमार यांनी वैद्यकीय अधिकारी यांच्यासह पाहणी केली नंतर जमीन मालकाच्या परवानगीने या विहिरीतच वडापाचा पाठ येथील उद्योजक द्या देसाई यांच्या जेसीबीच्या सहाय्याने माती टाकून सर्व मृत डुकरांचे दफन केले. यावेळी वनरक्षक शरद कांबळे संजीव जाधव अनिल परब,पोलीस पाटील नेवेश फर्नांडिस, दया देसाई, सत्यविजय भोगले, रोहन पाताडे दिलीप परब यज्ञेश गुरव, अमित बागवे, भूषण मसुरेकर,रमेश पाताडे, साईप्रसाद बागवे,सचिन गोलतकर, केतन कांबळी आदीनी सहकार्य केले.

