कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

नांदगावातील गोवा दारूबाबत ठाकरे सेनेचे आज आंदोलन

नांदगावातील गोवा दारूबाबत ठाकरे सेनेचे आज आंदोलन

कणकवली : नांदगाव तिठा येथे गोवा बनावटीची दारू विक्री अनधिकृतपणे उघडपणे केली जात आहे. कारवाईची मागणी करूनही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळेच पुन्हा नांदगाव येथे राजरोसपणे दारू विक्री होत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर पोलिसांनी फक्त कारवाईचा देखावा उभा केला. परंतु प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही. त्यामुळे अनधिकृत दारूविक्री बंद न केल्यास १९ ऑक्टोबरला कणकवली पोलीस ठाण्यासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा शाखाप्रमुख हनुमंत म्हसकर यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनातून दिला आहे. नांदगाव येथील

पुलाखाली उभा असताना ‘तुम्ही आमच्या दारू विक्रीविरोधात आवाज उठवता का? आमचा विरोध सोडा. नाहीतर तुम्हाला आम्ही रस्त्यावर आणू’, अशी धमकी आपल्याला दारू विक्री करणाऱ्याने दिले. तसेच राजकीय दबाव आणत, काय असेल तो विषय बसून मिटवून टाकूया, असे आमचे उपनेते गौरीशंकर खोत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांना फोन करण्यात आले. तसेच धमकी देण्याचा प्रयत्नाही झाला. नांदगाव तिठा येथील अवैध दारूविक्रीबाबत पोलिसांना अर्ज दिला. मात्र, कारवाई झाली नाही. त्यानंतर दोनवेळा दारू विक्री पकडून दिली. तरीही पोलिसांनी ठोस कार्यवाही केली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!