कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

झोपडी जाळल्याप्रकरणी संशयिताला अटक, कोठडी

*🟥झोपडी जाळल्याप्रकरणी संशयिताला अटक, कोठडी*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.११:* शहरातील बाहेरचावाडा येथील रमेश सुभाष जाधव या मजुराची झोपडी जाळून नुकसान केल्याप्रकरणातील गुन्ह्यात फरार असलेला संशयित गालिब चांद कोंडी (३५ रा. कोलगाव ता. सावंतवाडी) याला अखेर पाच महिन्यांनी सावंतवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याला मंगळवारी सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयिताला पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील यांनी दिली. मूळ विजापूर येथील रमेश जाधव हे २००४ पासून रोजगारासाठी बाहेरचावाडा येथे झोपडी बांधून आपल्या कुटुंबासमवेत राहतात. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जाधव कुटुंबिय कामानिमित्त गावी गेले होते. हीच संधी साधून अज्ञाताने त्यांची झोपडीला आग लावून त्यांचा संसार उद्ध्वस्त केला होता. याबाबत रमेश जाधव यांनी संशयिताच्या नावासह तक्रारही पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी पोलीस अधिकारी उपनिरीक्षक सुरज पाटील यांनी संशयित गालिब चांद कोंडी याची चौकशी केली असता गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली. त्यानुसार गालिब कोंडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मे महिन्यापासून संशयित गालिब कोंडी हा फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर पोलिसांनी पाच महिन्यानंतर सापळा रचून गालिब कोंडी याला सोमवारी रात्री अटक केली. मंगळवारी सावंतवाडी न्यायालयासमोर त्याला हजर केले असता न्यायालयाने पंधरा दिवस दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील यांनी दिली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!