दीपक केसरकर यांच्याकडून ग्रामसडक अधिकारी धारेवर
*🟥दीपक केसरकर यांच्याकडून ग्रामसडक अधिकारी धारेवर*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.१०:* सचिवस्तरावरून तोंडी आदेश घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील कामाचे नियम स्थानिक पातळीवर बदलून निविदा काढल्याने शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सावंतवाडी नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात ही बैठक झाली. पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कामाच्या नियमात बदल करून निविदा प्रक्रिया राबविल्याने अनेकांनी टेंडर भरलेच नाही त्याचा भुर्दंड केसरकर यांच्या मतदार संघाला बसला. त्यामुळे ठेकेदारांनी बैठकीत गाहाणे मांडले. अधिकाऱ्यांची चूक लक्षात येताच केसरकर यांनी संबंधितांना झापले. तर मंत्रालय पातळीवर याबाबत बैठक घेऊन ठेकेदारांच्या समस्या सोडवू असे आश्वासन केसरकर यांनी दिले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पंतप्रधान ग्रामसडक योजनेची कामे रखडली आहेत. येथील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता निविदा प्रक्रिया राबविताना संबंधित अधिकाऱ्याने स्थानिक पातळीवर नियमात बदल केला. त्याचा आर्थिक परिणाम
ठेकेदारांना सहन करावा लागणार होता. ही बाब लक्षात घेता ठेकेदारांनी निविदा भरल्या नाहीत. कामे न झाल्याने केसरकर यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची बैठक घेतली. ठेकेदारांनी आपली कैफियत केसरकर यांच्यासमोर मांडली. सदरची कामे केल्यास आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार, याकडे लक्ष वेधले, याला अधिकाऱ्यांची चूक कारणीभूत असल्याचे उघड होताच केसरकर यांनी संबंधितांना चांगलेच धारेवर धरले. ठेकेदारांचे प्रश्न आणि तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी आपण मंत्रालय पातळीवर संबंधित मंत्र्यांसोबत बैठक घेऊ, असे स्पष्ट केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

