🟥 देवगड जामसंडे नगरपंचायतीचे नगरसेवक रोहन खेडेकर यांचे आयुक्तांनी अपील फेटाळला..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴देवगड,दि-०७:- देवगड जामसांडे नगरपंचायतीचे शिवसेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांना नगरसेवक असताना नियमबाह्य केलेल्या बांधकाम प्रकरणी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी नगरसेवक म्हणून राहण्यास अपात्र ठरवले होते याबाबत त्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील सादर केले होते. हे अपील अमान्य होऊन नगरसेवक रोहन खेडेकर यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.
माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती ही तक्रार मान्य करून खेडेकर यांना नगरसेवक म्हणून राहण्यास अपात्र ठरविण्यात आले होते याबाबत खेडेकर यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते मात्र हे अपील फेटाळला असून सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम केला आहे.

