कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिक

सर्व आरक्षित समाज घटकांची आठ रोजी कुडाळला बैठक

*🟥सर्व आरक्षित समाज घटकांची आठ रोजी कुडाळला बैठक*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 मालवण, दि.०६:* जिल्ह्यातील सर्व आरक्षित समाज घटकांतील नागरिकांची व्यापक व खुली विचारसभा ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता कुडाळ येथील मराठा समाज सभागृह (तळमजला) येथे आयोजित करण्यात आली आहे. सध्या देशभरातील ओबीसींच्या आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्याचवेळी जातनिहाय जनगणना या विषयावर संपूर्ण जनमानसात वैचारिक घुसळण सुरू झाली आहे. महाराष्ट्रात मराठा समाजासाठीच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दुसऱ्या बाजूला ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण देण्यास कोणत्याही आरक्षित समाज वर्गाचा आक्षेप नाही. तर देशाच्या उर्वरित राज्यांमध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळत असताना, महाराष्ट्रात मात्र धनगर आरक्षणाचे घोंगडे कित्येक वर्षे तसेच भिजत ठेवण्यात आले आहे. या आणि या संबंधाने देशभरात घडत असलेल्या अशा सर्व घटनांबाबत सिंधुदुर्गातील ओबीसी, बीसी, एससी, एसटी, एनटी, एसबीसी, व्हीजे १-२-३ आदी सर्व आरक्षित समाज घटकांचे जिल्ह्याचे म्हणून एक सर्वसमावेशक धोरण निश्चित करण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून ही बैठक आयोजित केली आहे.

*ओबीसींसह सर्व वर्गानी उपस्थित राहण्याचे आवाहन*

आरक्षित प्रवर्गात मोडणाऱ्या सिंधुदुर्गातील सर्व ज्ञाती संघटनांच्या जिल्हा व तालुका समित्यांच्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीला निमंत्रीत करण्यात आले आहे. त्याही पलिकडे आरक्षण टिकवून ठेवण्याच्या कामी आपले योगदान देऊ इच्छीणाऱ्या सर्वच समाधुरीणांनीही आपली भूमिका मांडण्यासाठी आवर्जून उपस्थित राहवे, असे आवाहन आरक्षित समाज महासंघ, सिंधुदुर्गतर्फे सर्वश्री आनंद मेस्त्री, काका कुडाळकर, सुनील भोगटे, रमण वायंगणकर, नंदन वेंगुर्लेकर, बाळासाहेब बोर्डेकर, नितीन वाळके, महेश परुळेकर, महेश अंधारी, वंदन वेंगुर्लेकर, साक्षी वंजारी आदींनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!