कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सावंतवाडीत महास्वच्छता अभियानाला प्रतिसाद

*🟥 सावंतवाडीत महास्वच्छता अभियानाला प्रतिसाद*

*🟥 न.पा.कर्मचाऱ्यांसह डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, क्रेडाई सावंतवाडी, पोलीस कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी,दि-०२:-* महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ऑक्टोबरला जाहीर केलेल्या ‘महास्वच्छता’ अभियानाला सावंतवाडी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सावंतवाडी नगरपालिकेने नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संघटना व पालिका कर्मचारी यांच्यावतीने प्रभागवार स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत विद्यार्थी, नागरिक, विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुख्याधिकारी सागर साळुंखे, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, दीपाली भालेकर, दीपाली सावंत, भारती मोरे, सुरेश भोगटे, रोटरी क्लबचे पदाधिकारी, राणी पार्वतीदेवी हायस्कूल, मिलाग्रीस हायस्कूल, कळसुलकर हायस्कूल, वि. स. खांडेकर हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी स्वच्छता मोहिमेतसहभाग घेतला. यानिमित्त स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. तसेच मोती तलावाच्या काठावर मोठी साखळी तयार करण्यात आली होती. सकाळी दहा वाजल्यापासून स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. सावंतवाडी शहर तसेच अंतर्गत सर्व प्रभागातही पालिका कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

दरम्यान, पोलिसांनीही मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ केला. या मोहिमेचे विशेष म्हणजे परिसरात असलेला जास्तीत जास्त प्लास्टिक कचरा गोळा करून परिसर प्लास्टिकमुक्त करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक इंगवले, अमित गोते, आनंद यशवंते, पोलीस हवालदार राऊत, वालावलकर, जाधव, सहाय्यक फौजदार देसाई, महिलोलीस अंमलदार धनुजा ठाकुर, पूजा जाधव, शर्मिला गवस, महिला पोलीस नाईक चैताली देसाई, शिल्पा केदार, महिला पोलीस हवालदार सावंत, ज्योती दुधवडकर, साक्षी कोपकर, होमगार्ड भांडे, वेंगुर्लेकर आदींसह पंचम खेमराज महाविद्यालयातील एनसीसी, आर्मी विभागातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!