कुडाळकोकणमहाराष्ट्रशैक्षणिक

आंदुर्ले नं. १ ची विद्यार्थीनी जवाहर नवोदय विद्यालय सांगेली येथे पुढील शिक्षणासाठी निवड

*🟥आंदुर्ले नं. १ ची विद्यार्थीनी जवाहर नवोदय विद्यालय सांगेली येथे पुढील शिक्षणासाठी निवड*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सिंधुदुर्ग, दि.०२:**आंदुर्ले गावची रहिवासी व शाळा आंदुर्ले नं. १ ची विद्यार्थीनी कु. दिक्षा प्रसाद पाटील हिची जवाहर नवोदय विद्यालय, सांगेली येथे पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे. इयत्ता ५वी मध्ये जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२३ ला बसली होती. या परिक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे ती पुढील शिक्षणासाठी पात्र ठरली आहे. हे विद्यालय केंद्र शासन अनुदानित आहे. प्रत्येक जिल्ह्यातील टॉप ८० विद्यार्थ्यांची निवड करुन इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत कोणतेही शुल्क न घेता उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते.(CBSE अभ्यासक्रम). विद्यार्थ्यांना मोफत निवासी दर्जाचे शिक्षण दिले जाते.
यासाठी फॉर्म भरण्यासाठी श्री. सुशिल ठाकूर सर यांनी विशेष मेहनत घेतली तर श्री. नरेश राऊळ सर यांनी आवश्यक असणारा सर्व अभ्यासक्रम त्यांच्या घरी मोफत क्लास घेऊन पूर्ण करुन घेतला तसेच वेळोवेळी आवश्यक मार्गदर्शन केल्याचे कु. दिक्षा हिने सांगितले. तसेच तिने आपले काका श्री. संतोष पाटील यांचेही वेळोवेळी बहुमुल्य मार्गदर्शन मिळत होते असे सांगितले .
या यशामुळे आपण खुष आहोत पण सोबतच आपल्या ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांनी पण प्रेरणा घेऊन या परिक्षेला बसून यश संपादन करावे अशी इच्छा तिने व्यक्त केली.
तिच्या या यशाबद्दल आंदुर्ले ग्रामस्थांनी आणि शिक्षक व विद्यार्थी वर्गातून शुभेच्छांचा वर्षाव केला.
या तिच्या यशाचे कैतुक करण्यासाठी सौ. पुजा सर्वेकर, श्री. अरूण तांडेल, श्री. अजित सर्वेकर, श्री. आनंद परब यांनी तिच्या घरी भेट घेऊन तिला भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!