आणखीमहाराष्ट्रशासकीय

🟥 महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींकडून मंजुरी..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मुंबई, दि-३०:- महिला आरक्षण विधेयकाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. संसदेच्या विशेष अधिवेशनात हे विधेयक पास झालं होतं. लोकसभा आणि राज्यसभेत हे विधेयक बहुमताने पास झालं. त्यानंतर हे विधेयक अंतिम मंजुरीसाठी राष्ट्पती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवण्यात आलं होतं.
अखेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकाला मंजुरी दिली आहे. आता या विधेयकाला कायद्याचं स्वरुप प्राप्त झालं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मंजुरी मिळताच केंद्र सरकारने एक गॅझेट नोटिफिकेशन जारी केलं आहे. या विधेयकाला ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’ असं संबोधलं जाणार आहे. आता अनुच्छेद 334 ए च्या माध्यमातून संविधान सहभागी केलं जाणार आहे. या कायद्याच्या माध्यमातून लोकसबा आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार आहे.
हे विधेयक 20 सप्टेंबरला लोकसभेत आणि 21 सप्टेंबरला राज्यसभेत मांडण्यात आलं होतं. लोकसभेत या विधेयकाच्या बाजून 454 मतं पडली होती. फक्त दोन खासदारांनी या विधेयकाचा विरोध केला होता. तर राज्यसभेत बिल मांडलं तेव्हा 214 खासदार उपस्थित होते. त्या सर्वांनी विधेयकाच्या पक्षात मतं टाकली. त्यानंतर हे विधेयक अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलं होतं.

हा कायदा कधीपासून लागू होणार

महिला आरक्षण विधेयकाची मागणी गेल्या 27 वर्षांपासून होत होती. आता या कायद्यामुळे संसद आणि राज्यांच्या विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षित जागांमधील एक तृतीयांश जागा एससी आणि एसटी प्रवर्गातून येणाऱ्या महिलांसाठी आरक्षित असतील.
आरक्षित जागा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात वेगवेगळ्या क्षेत्रानुसार रोटेशन पद्धतीने लागू केल्या जातील. महिलांसाठीच्या जागेसाठीचं आरक्षण 15 वर्षांसाठी असणार आहे. ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’ कायदा प्रत्यक्षात कधी अंमलात येईल याबाबत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

विधेयकातील तरतुदीनुसार लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीनंतर आरक्षित जागा रोटेड केली जाईल. 2024 लोकसभा निवडणुकीत हे विधेयक लागू पडणार नाही. पुढची जनगणना आणि जागांचं परिसीमन झाल्यानंतरच हे विधेयक लागू होईल.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!