🟥 विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलातर्फे ‘शिवशौर्य’ यात्रेचे शनिवार दिनांक 30 सप्टेंबरला दोडामार्ग येथून होणार सुरुवात..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२९:- यंदा विश्व हिंदू परिषदेलाही ६० वर्ष पूर्ण होत आहेत. हा सुवर्णयोग साधून विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलातर्फे ‘शिवशौर्य’ यात्रेचे शनिवार दिनांक 30 सप्टेंबरला सकाळी ८.०० वाजता दोडामार्ग येथे यात्रेस सुरुवात होणार आहे.तरी या यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन सावंतवाडी शहर यात्रा प्रमुख तथा दल संयोजक
गौरव शंकरदास, ,धर्मप्रसारप्रमुख सुनील सावंत ,कोषाध्यक्ष रवी सातवळेकर, सह कोषाध्यक्ष विनायक रांगणेकर ,प्रसिद्धी प्रमुख किशोर चिटणीस विशाखा रांगणेकर यांनी केले आहे याबाबतची पत्रकार परिषद सावंतवाडी येथे घेण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक परकीय आक्रमकांच्या तावडीतून प्रदेशाला सोडवून स्वराज्याची निर्मिती केली. कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. या प्रसंगास सन २०२३ २४ या वर्षात ३५० वर्ष पूर्ण होत आहेत.
समरस, सुसंघटीत हिंदू समाजाची निर्मिती करणे, आपला सांस्कृतिक वारसा आणि जीवन मूल्यांचे संरक्षण, संवर्धन करणे, अन्य धर्मात गेलेल्या परंतु हिंदू जीवन पद्धतीबद्दल आस्था असणार्या बंधू भगिनींना हिंदू धर्मात आणणे, गरीब, उपेक्षित वनवासी गीरीवासी, शहरवासी बंधू भगिनींची सेवा करणे या व इतर उद्देशाने १९६४ साली श्रीकृष्णजन्माष्टमीस पूज्य संत धर्माचार्य आणि दार्शनिकांच्या मंथनातून विश्व हिंदू परिषदेचा जन्म झाला. आज जगातील १२५ देशांतील हिंदू समाजाशी संपर्क प्रस्थापित करण्यात परिषदेला यश मिळाले आहे. यंदा विश्व हिंदू परिषदेलाही ६० वर्ष पूर्ण होत आहेत. हा सुवर्णयोग साधून विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलातर्फे ‘शिवशौर्य’ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक 30/०९/२०२३ रोजी सकाळी ८.०० वाजता दोडामार्ग येथे यात्रेस सुरुवात होईल. सकाळी ११.०० वाजता टोपीवाला तांत्रिक महाविद्यालय (पोलीस लाईन) सावंतवाडी येथे यात्रेचे आगमन होईल. तरी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन: विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलातर्फे करण्यात आले आहे
सावंतवाडीतील नियोजित यात्रेचा कार्यक्रम
सकाळी ११.०० वाजता टोपीवाला तांत्रिक महाविद्यालय ( पोलीस लाईन), सावंतवाडी येथे यात्रेचे आगमन व खेमसावंत भोसले यांच्या शुभ हस्ते स्वागत होणार आहे
यात्रा मार्ग (दर्शन थांबे) शिरोडा नाका- मिलाग्रीस हायस्कूल- जयप्रकाश चौक- गांधी चौक (कॉर्नर सभा)- रामेश्वर प्लाझा- भोसले उद्यान राजवाडा (येथे सांगता समारोह) होणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले .
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

