🟥 सावंतवाडी शहरात दोन तरुणांचे काल झालेले अपघाती मृत्यू हे प्रशासनाच्या अनास्थेचे बळी
🟥 या पूर्वी अनेक वेळा शहरातील धोकादायक झाडे तोडण्याची केली होती मागणी..
🟥 मंत्र्यांच्या हट्टापायी आठवडा बाजारही धोकादायक जागेत ; मनसे तर्फे ॲड. अनिल केसरकर यांचा आरोप
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-२७:- सावंतवाडी शहरात काल दोन तरुणांच्या बाबतीत जो दुर्दैवी प्रकार घडला तो अत्यंत क्लेशदायक असून या दोन्ही कुटुंबीयांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सामील आहे. या दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून योग्य ती मदत तात्काळ मिळाली पाहिजे. या घटनेत दोन्ही युवक हकनाक बळी पडले आहेत. शहरातील धोकादायक झाडे तोडा अशी मागणी या पूर्वी मनसे व काही सामाजिक संघटनांतर्फे करण्यात आली होती मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. प्रशासन आपली जबाबदारी झटकून किंव्हा एकमेकांकडे बोट दाखवून मोकळं होत व त्यामुळे असे प्रसंग वारंवार उद्भवत आहेत. सावंतवाडीचा आठवडा बाजार देखील अतिशय धोकादायक अश्या जागेत भरवला जात आहे. केवळ आमदार ,मंत्री यांच्या हट्टापायी अनेक नागरिकांचे प्राण धोक्यात आणले जात आहेत. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून या आठवडा बाजाराबाबत देखील योग्य तो निर्णय घ्यावा व शहरासह आजूबाजूच्या परिसरातील धोकादायक झाडे तातडीने तोडावीत अशी मागणी मनसे तर्फे विधी व जनहित कक्ष जिल्हा संघटक ॲड. अनिल केसरकर यांनी केली आहे.
*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…👇👇*
🥳💥🎉🎊🎉💥🥳
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*

