एसटी महामंडळाचा मनमानी कारभार!
*🟥एसटी महामंडळाचा मनमानी कारभार!*
*🟥मुंबईच्या एसटी फेरीसाठी एकच चालक : चोवीस तासांपेक्षा जास्त ड्युटी!*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 ओटवणे, दि.२७:* महाराष्ट्र राज्य एसटी परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबईच्या दिशेने खास गणेश चतुर्थीनिमित्त सोडण्यात येणाऱ्या प्रवासी गाड्यांसाठी एकच चालक पाठवण्यात येत असल्याने बोरिवलीपर्यंत सुमारे ५५० किलोमीटर अंतरावर विनावाहक सुमारे ४५ पेक्षा जास्त प्रवाशांचा जीव धोक्यात घालत आहेत, असा आरोप मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन प्रदेश सचिव अमित वेंगुर्लेकर यांनी केला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी आपला पैसा वाचवण्याच्या नादात एस. टी. कामगारांचे जीव धोक्यात घालून मनमानी पद्धतीने विनावाहक तसेच एकच चालकाची ड्युटी येता जाता चोवीस तासांच्यापेक्षा अधिककाळ करवून घेत आहेत, असे वेंगुर्लेकर म्हणाले.
गणेश चतुर्थीच्या काळात कोकणात पर जिल्ह्यातील चाकरमान्यांची सदर मुंबई महामार्गावरून वर्दळ सुरू असताना विनावाहक सुमारे ५५० किलोमीटर अंतरावर अमित वेंगुर्लेकर कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या चालकाला प्रवाशांचा जीव मुठीत धरून वाहन हाताळावे लागत आहे. परंतु जर एखाद्या वेळेस अपघात घडला किंवा गाडीबिघाड झाला तर जबाबदारी कोणाची? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांची प्रवासासाठी योग्य दर आकारणी करूनसुद्धा एस. टी. परिवहन महामंडळाच्या मनमानी कारभारमुळे चालक पदावर असलेले कामगार जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. याबाबत संबंधित प्रशासनाने त्वरित योग्य तो निर्णय घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या नियमानुसारच चालक व वाहक यांची ड्युटी नोंदवावी. अन्यथा संबंधित चालकांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात राज्य मानवाधिकार आयोग संस्थेकडे तक्रार दाखल करण्यात येईल. याबाबत पत्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे सिंधुदुर्ग व्यवस्थापकीय कार्यालयात देण्यात येणार असल्याचे वेंगुर्लेकर यांनी सांगितले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

