“होऊ द्या चर्चा ” या कार्यक्रमातून केंद्र सरकारच्या अपयशाची जनजागृती करणार – गुरुनाथ खोत
*🟥 “होऊ द्या चर्चा ” या कार्यक्रमातून केंद्र सरकारच्या अपयशाची जनजागृती करणार – गुरुनाथ खोत*
*🟥 सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हा शिवसेनेचा बालेकिल्ला ; १ ते १२ ऑक्टोंबर जिल्ह्यात कार्यक्रम..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी: प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली,दि-२६:-* सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हा लोकसभा मतदारसंघ बालेकिल्ला आहे. लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुकीत शिवसेनाच जिंकेल.आम्हीच जिकणार आहोत. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी “होऊ द्या चर्चा ” हा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख आलेत का? महागाई कमी झाली का?या मुद्द्यांची चर्चा प्रत्येक गावात, प्रत्येक घरात आणि वाडी वार १ ते १२ ऑक्टोंबर या कालावधीत करणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे निरीक्षक तथा शिवसेना नेते गुरुनाथ खोत यांनी दिली. कणकवली येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनेते गौरीशंकर खोत,जिल्हाप्रमुख संदेश पारकर,विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला आघाडी प्रमुख निलम पालव – सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,शहरप्रमुख प्रमोद मसुरकर व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत जिल्हाप्रमुख आणि सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
“होऊ द्या चर्चा” हा कार्यक्रम घेण्याचे जाहीर केले. देशामध्ये विरोधी पक्षांची इंडीया ही आघाडी झाली आहे.त्यानंतर मोदी सरकारने सर्वच कार्यक्रम भारत या नावाने सुरू केले आहेत. त्यामुळे देशातील विरोधी पक्षाने एकजूट करत सत्ताधाऱ्यांचे अपयश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा धोरण हाती घेतले आहे .त्यानुसारच हा कार्यक्रम रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात घेण्यात येणार आहे,असे गुरुनाथ खोत यांनी सांगितले. केंद्रात २०१४ मध्ये सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर १५ लाख रुपये देणार आणि महागाई कमी करणार, त्याचबरोबर परदेशात गुंतवणूक बेनामी संपत्ती असलेल्या लोकांवर कारवाई करण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते.याबाबत कोणतीही आश्वासने मोदी सरकारने पाळली नाहीत.त्यांनी कोणाचेही मुसक्या आवळल्या नाहीत,याबाबत सामान्यांमध्ये जाऊन या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येईल असे श्री.खोत यांनी सांगितले. आता निवडणुका तोंडावर आल्यामुळे दोनशे रुपये गॅस चा दर कमी करण्यात आला, मात्र गेल्या ९ वर्षात सर्वसामान्य ग्राहकांकडून लूट करण्यात आली आहे.आधारकार्ड ,आधार आणि पॅनकार्ड लिंक,गॅस कार्ड लिंक करा.या सारखे प्रकार जनतेला त्रासदायक केले आहेत.या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गाव गावात,जिल्ह्यात ,वाडीवर भेटी देणार आहोत. पुढील १ ते १२ ऑक्टोंबर आम्ही सर्वांना सोबत घेऊन लोकांसमोर जाणार आहोत.प्रत्येक तालुक्यात आम्ही जाणार आहोत.मी स्वतः निरीक्षक या नात्यांने आम्ही जनतेला जागृत करणार आहोत,असेही गुरुनाथ खोत यांनी सांगितले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

