क्राइममहाराष्ट्र

🟥 राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कोल्हापूर विभागीय पथकाची नांदगाव गिरगांव येथे कारवाई..

🟥 २४ लाख ४५ हजार ६२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴बांदा,दि-२४-: राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कोल्हापूर विभागीय पथकाने नांदगाव गिरगांव (ता. करवीर) रस्त्यावर गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या मोटारीवर कारवाई करत एकूण २४ लाख ४५ हजार ६२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चालक गजानन पाटील (वय ४७, रा. रुईकर कॉलनी, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांचेवर अटकेची कारवाई करण्यात आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोव्यातून कोल्हापूरच्या दिशेने गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क खात्याच्या कोल्हापूर विभागीय भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार नांदगाव गिरगांव रस्त्यावर सापळा रचण्यात आला होता. कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीला (जीए ०३ वाय १३६३) तपासणीसाठी थांबविण्यात आले. मोटारीत काळ्या रंगाच्या कपड्याखाली पुठ्ठ्याचे खोके झाकून ठेवण्यात आले होते. त्याची शहानिशा केली असता आतमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या १८० मिली मापाच्या १२४८ बाटल्या, ७५० मिली मापाच्या ३२४ बाटल्या व २००० मिलीच्या १२ बाटल्या असे एकूण ५५ खोके जप्त करण्यात आले. वाहनासह एकूण २४ लाख ४५ हजार ६२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क खात्याचे कोल्हापूर विभागीय उपायुक्त व्ही. पी. चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक एस. एस. गोंदकर, आर. जी. येवलुजे, कॉन्स्टेबल विलास पवार, सुशांत बनसोडे, अमोल यादव, योगेश शेलार यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. एस. गोंदकर करीत आहेत.

 

 

 

*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…👇👇*

 

 

🥳💥🎉🎊🎉💥🥳

*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

 

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

 

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

 

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

 

*📞संपर्क* – 9860055359

9422435891

9175242886

 

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*

https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

 

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!