कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 म्हापण चव्हाणवाडी येथील ३१ गणपतींचे अवेळी विसर्जन..

🟥 आकस्मिक निधनामुळे सर्व चव्हाणवाडीचा गणपती विसर्जनाचा निर्णय..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴वेंगुर्ला, दि-२३:- वेंगुर्ला तालुक्यातील म्हापण गावातील चव्हाणवाडी येथे राहणाऱ्या श्री चंद्रकांत विठ्ठल चव्हाण यांची पत्नी सौ चंद्रकला चंद्रकांत चव्हाण हिचे अल्पशा आजाराने अकाली निधन झाले. या घटनेने संपुर्ण चव्हाणवाडीत विषेश करून महीला वर्गात शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटूंबियांच्या दुःखात सहभागी होत सहवेदना म्हणून सर्व ११ व ३ दिवसांच्या वारशी मंडळीने आपले गणपती आज सकाळी उत्तरपूजा न करता जड अंतकरणाने विसर्जित केले. संपूर्ण चव्हाणवाडी मध्ये पाहुणे व वाराशी मंडळी धरुन जवळपास ४२ बाप्पांचे प्रतिवर्षी मनोभावे पूजन केले जाते. यापैकी ३१ बाप्पांचे एकत्र विसर्जन आज सकाळी करण्यात आले तर मयत यांच्या घरातील दोन गणपतींचे रात्रीच विसर्जन करण्यात आले. चव्हानवाडी मध्ये अशाप्रकारे सर्व गणपती एकत्रित विसर्जीत करण्याची ही पहिलीच घटना घडली आहे. असा प्रसंग पुन्हा आणू नको असे मागणे करत साश्रू नयनांनी सर्वांनी बाप्पाचा निरोप घेतला. या दुर्दैवी प्रसंगाने प्रत्येकाचे मन खिन्न झाले आहे. या प्रसंगात ठिकठिकाणच्या पाहुणे मंडळीने येवून विसर्जन कार्यात प्रमुख हातभार लावला. त्यांचे चव्हाणवाडीच्या वतीने आभार मानण्यात आले.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!