राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी घेतले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गणपतीचे दर्शन
सावंतवाडी, दि. २१ : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे जेष्ठ नेते विनोद तावडे आणि मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी राज्यातील जनतेला सुखी ठेव, असे साकडे त्यांनी गणरायाच्या चरणी घातले. श्री. केसरकर हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज मुंबईत जाऊन विविध ठिकाणी गणरायांचे दर्शन घेतले.

