दोडामार्ग मध्ये वारंवार विद्यूत पुरवठा खंडीत माजी सरपंच रामचंद्र सावंत यांची नाराजी
दोडामार्ग मध्ये वारंवार विद्यूत पुरवठा खंडीत माजी सरपंच रामचंद्र सावंत यांची नाराजी
विद्यूत पुरवठ्यातील त्रुटी तात्काळ दूर करा अन्यथा ग्रामस्थांघ्या रोषाला सामोरे जावे लागले.
दोडामार्ग, दि २१ : तालुक्यात तळकट व पंचक्रोशीत चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवस वारंवार वीज गायब होण्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत माजी सरपंच रामचंद्र सावंत यांनी नाराजी व्यक्त केली असून तात्काळ यांची दखल घेऊन दुरुस्ती करा, अन्यथा ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा वीज कंपनीला दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तळकट व पंचक्रोशीत केले दोन दिवस वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. याबाबत वेळोवेळी वीज वितरणला कळवून सुद्धा कोणी दखल घेत नाही. त्यामुळे ऐन चतुर्थीत ग्रामस्थांना काळोखात राहावे लागत आहे. त्यामुळे वीज कंपनीच्या धोरणाविषयी नाराजी आहे. त्यामुळे याची तात्काळ दखल घेऊन अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

