🟥 ठाणे वाहतूक विभागाकडून सहा कोटींचा दंड वसूल..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴ठाणे, दि-२०:– ठाणे वाहतूक विभागाने यंदाच्या वर्षात केलेल्या धडक कारवाईच्या दंडाच्या रकमेने कोट्यवधीची उड्डाणे घेतली आहेत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लघन करणाऱ्या वाचालकांवर आकारलेल्या दंडाची कोटीच्या घरात आहे.
जानेवारी ते ऑगस्टअखेर कारवाईच्या चलनाचा आकडा ६ लाख ३४ हजार ७४२ एवढा आहे. तर यापैकी २ हजार ६३३ प्रकरणे ही न्यायालयात पाठविण्यात आली आहेत. तर प्रत्यक्षात ६ कोटी ३२ लाख १४ हजार ९५० रुपये वाहतूक विभागाने वसूल केल्याची माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली.
ठाणे शहर वाहतूक वाहतूक विभागाने केलेल्या कारवाई आणि चलन आकारणीचा आकडा ६ लाख ३४ हजार ७४२ एवढा आहे. तर यापैकी वाहतूक विभागाने वसुली
केलेल्या न्यायालयात पाठविण्यात आलेल्या चलनाची संख्या ८६ हजार ६७७ इतकी आहे. तर दंडाची प्रलंबित चलनाची रक्कम ४७ कोटी ६४ लाख ५५ हजार ३०० रुपये आहे.
दंडाच्या ५३ कोटी ९६ लाख ७० हजार २५० रकमेपैकी केवळ ६ कोटी ३२ लाख १४ हजार ९५० रुपये रक्कम इतकीच वसुली करण्यात वाहतूक विभागाला यश मिळालेले आहे. त्यामुळे चालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, कल्याण आरटीओने बेशिस्त रिक्षा आणि टॅक्सी चालकांना चाप बसावा, यासाठी प्रवाशांना तक्रार करण्यासाठी व्हॉट्स अॅप नंबर जारी केला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून आठ महिन्यांत ९० हून अधिक प्रवाशांनी बेशिस्त रिक्षाचालकांच्या तक्रारी केल्या आहेत. या चालकांकडून एक लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. भाडे नाकारणे, जास्तीचे भाडे आकारणे, मनमानी भाडे सांगणे आदी तक्रारींचा समावेश आहे.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

