आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

वाफोली येथे दोन बोक्यांच्या भांडणात झोपलेल्या मुलावर बोक्याचा हल्ला-मुलगा गंभीर जखमी

वाफोली येथे दोन बोक्यांच्या भांडणात झोपलेल्या मुलावर बोक्याचा हल्ला-मुलगा गंभीर जखमी.

वाफोली येथील नाविन्य सतीश गवस या सहा वर्षिय मुलावर झोपेत दोन बोक्यांच्या भांडणात शेजारच्या बोक्याने हल्रा केल्याने छोटा मुलगा गंभीर जखमी झाला आहे,बोक्याने त्या मुलाच्या डोक्याला गालाला,ओठांना चावा घेतल्याने नाविन्य जखमी झाला, रक्तबंबाळ परिस्थिती त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या बाबत अधिक माहिती अशी की वाफोली येथील कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल चे बांदा प्रतिनिधी शैलेश गवस यांचा भाऊ व त्याचे कुटुंब पुणे येथून गणेश उत्सवा साठी आपल्या गावी आली होती, घरातील वडीलधारी मंडळी भजनासाठी गेली होती ती पहाटे चार वाजता येऊन झोपली.
सकाळी पाच च्या सुमारास नाविन्याच्या शेजारी त्यांचा पाळीव बोका झोपला होता,त्याला मारण्यासाठी शेजारचा बोका घरात घुसला नाविन्य व इतर मंडळी साखर झोपेत असताना त्या बोक्याने नाविन्याच्या शेजारी झोपलेल्या बोक्यावर झडफ घातली तो बोका पळून गेला व झडप घालणाऱ्या बोक्याने नाविन्याला आपले लक्ष केले.
नाविन्याच्या डोक्याला,गालाला,ओठांना चावा घेऊन त्याला रक्तबंबाळ केले, लहान मुलाचे ओरडने ऐकून सगळी मंडळी जागी झाली,व बोका पळून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!