कारिवडे गावचे वीर सुपुत्र शहीद सुनील सावंत यांना अखेरचा निरोप
*🟥कारिवडे गावचे वीर सुपुत्र शहीद सुनील सावंत यांना अखेरचा निरोप*
*🟥अमर रहे अमर रहे सुनील सावंत अमर रहे च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.१६:* “जब तक सूरज चांद रहेगा, सुनील सावंत आपका नाम रहेगा…!”, “अमर रहे, अमर रहे, सुभेदार सुनील सावंत अमर रहे!’, “वंदे मातरम्..!, भारत माता की जय..! ” ‘अमर रहे, वीर जवान सुनील सावंत अमर रहे..!”
अशा हजारो घोषणांसह साश्रूपूर्ण नयनांनी, पंजाब येथे शहीद झालेले १९ मराठा बटालियनचे जेसीओ सुभेदार तथा कारीवडे गावचे वीर सुपुत्र सुनील राघोबा सावंत यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला.
महाराष्ट्र पोलीस व जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून शहीद सुनील सावंत यांना अखेरची मानवंदना दिली. शहीद सुनील सावंत यांचे पार्थिव विमानातून शनिवारी सकाळी नियोजित वेळेपेक्षा तब्बल तीन तास उशिरा दिल्ली विमानतळावरून गोवा – मोपा विमानतळावर पोहोचले. त्यानंतर गोवा येथून दुपारी दोन वाजता त्यांचे पार्थिव बेळगाव भारतीय सैन्य दलाच्या एएलएस गाडीतून कारीवडे गावात दाखल झाले. त्यानंतर भैरववाडी शाळा ते शहीद सुनील सावंत यांच्या घरापर्यंत त्यांच्या अंतिम यात्रेस सुरुवात झाली.
त्यांचे पार्थिव घरी आणल्यानंतर मुलगी स्नेहल, मुलगा संज्योत, पत्नी सुप्रिया, वडील राघोबा यांच्यासह सावंत कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. यावेळी उपस्थित सर्वांचे डोळे अक्षरशः पाणावले. त्यानंतर “शहीद सुभेदार सुनील सावंत अमर रहे, जब तक सूरज चांद रहेगा, सुनील सावंत आपका नाम रहेगा..!” अशा भावपूर्ण घोषणांनी त्यांच्या अंतिम यात्रेस सुरुवात झाली.
या अंत्ययात्रेत महिलांसह शेकडो ग्रामस्थांचा सहभाग होता. यानिमित्त कारिवडे भैरववाडी शाळा, शहीद सुनील सावंत यांचे घर ते स्मशानभूमीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढून तसेच पताका लावून वीर जवान सुनील सावंत यांना भैरववाडीवासियांनी आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली. शहीद सुभेदार सुनील सावंत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सकाळपासूनच माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, सर्व माजी सैनिक, महसूल व पोलीस प्रशासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच कारीवडे परिसरातील सर्व महिला ग्रामस्थ येत होते. यावेळी शहीद सुनील सावंत यांना भारतीय सैन्य दलाच्या बेळगाव येथील आर्मी, मराठा बटालियन, महसूल व पोलीस आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी बंदुकीच्या फैरी झाडून अखेरची मानवंदना दिल्यानंतर शहीद सावंत यांचे सुपुत्र संज्योत सावंत याने मुखाग्नी दिला आणि “सुनील सावंत अमर रहे..!” अशा घोषणांनी शहीद सुनील सावंत यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

